AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit 2025: जर्मनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, देवेंद्र फडणवीस यांनी दिले आमंत्रण

न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत आणि जर्मनीच्या संबंधांवर आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर दृष्टीक्षेप टाकला. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांचे संबंध दृढ झाले आहेत.

News9 Global Summit 2025: जर्मनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, देवेंद्र फडणवीस यांनी दिले आमंत्रण
Devendra Fadnavis
| Updated on: Oct 09, 2025 | 8:01 PM
Share

भारताच्या प्रमुख न्यूज नेटवर्क टीव्ही 9 नेटवर्कद्वारा आयोजित न्यूज 9 ग्लोबल समिटची दूसरी आवृत्ती गुरुवारी जर्मनीच्या स्टटगार्ट येथे सुरु झाली आहे. समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्च्युअल रुपाने सहभागी होत भारत आणि जर्मनीच्या संबंधावर प्रकाश टाकला. याच वेळी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि जर्मनीचे ऋणानुबंध जाहीर करत जर्मनीतून होणाऱ्या गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र हे उपयुक्त क्षेत्र असल्याचेही म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर्मनीत न्यूज 9 ग्लोबल समिट आयोजित करण्यासाठी टीव्ही 9 चे कौतूक केले.. ते म्हणाले की मी टीव्ही 9 आणि TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांना News9 Global Summit 2025 साठी हार्दिक शुभेच्छा देत आहे.

येथे पोस्ट पाहा –

भारत-जर्मनी दरम्यान दृढ संबंध

ते म्हणाले की जर्मनी युरोपातील औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीचा महत्वाचा घटक आहे. आणि भारत आणि महाराष्ट्राचा प्रदीर्घकाळापासूनचा विश्वासू मित्र राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशात दरम्यानचे नाते आणखीन मजबूत झाले आहे. दोन्ही देशात व्यापार आणि कराराचा उद्देश्य भविष्यातील उद्योग आणि गुंतवणूकीचे वातावरण तयार करणे हा आहे.

ग्रीन हायड्रोजन, स्मार्ट मोबिलिटी, डिजिटल इनोव्हेशन आणि स्कील्ड डेव्हलपमेंट यात आमचे सहकार्य सातत्याने वाढत आहे. आणि आम्ही ग्लोबल इकॉनॉमित योगदान देत आहोत असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. जर्मनी इंजिनिअरिंग एक्सलेन्सच्या क्षेत्रात सहकार्य करत आहे. तर भारत एनर्जी आणि जागतिक स्तरिय मूलभूत सुविधांमध्ये सहकार्य करत आहे. इंडिया EU फ्री ट्रेड एग्रीमेंटच्या दिशेने पुढे चालला आहे, जी रोजगाराची अमूल्य संधी देणार आहे.

येथे पोस्ट पाहा –

महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी दिले निमंत्रण

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की आमच्या दरम्यान 1.9 दशलक्ष लोकांच्या सहकार्यासह ही भागीदारी जगातील सर्वात महत्वपूर्ण आर्थिक सेतूंपैकी एक बनू शकते. ज्यात जर्मनी एक केंद्रीय भूमिका वटवू शकतो.

ते म्हणाले की महाराष्ट्र भारताच्या सकल घरगुती उत्पादनात सुमारे 14% योगदान देत आहे आणि औद्योगिक उत्पादन तसेच प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूकीत अग्रणी आहे. एकट्या 2024 मध्ये आम्ही 20 अब्ज डॉलरची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूकीला आकर्षित केले आहे.जे राष्ट्रीय गुंतवणूकीच्या 31% आहे. या प्रकारे आम्ही एक प्रमुख गुंतवणूक केंद्राच्या रुपात स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी सांगितले की आमच्या जर्मन मित्रांनो महाराष्ट्र विकास, नाविण्यापूर्णता आणि दीर्घकालिक यशस्वीपूर्तते तुमचा सहकारी आहे. चला, आपण सर्व मिळून एका उज्ज्वल, एकत्रित भविष्याकडे वाटचाल करूया.”

'आमच डोकं खराब आम्हाला मोदीच पाहिजे', NDA बहुमतावर राणा काय म्हणाल्या?
'आमच डोकं खराब आम्हाला मोदीच पाहिजे', NDA बहुमतावर राणा काय म्हणाल्या?.
बिहार निकालानंतर राऊतांच्या पहिल्या प्रतिक्रियेवर भाजपचं प्रत्युत्तर
बिहार निकालानंतर राऊतांच्या पहिल्या प्रतिक्रियेवर भाजपचं प्रत्युत्तर.
शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री..
शिंदे म्हणाले, बिहारच्या लाडक्या बहिणींनी दिली लँडस्लाईड व्हिक्ट्री...
सुळेंकडून नितीशबाबूंचं कौतुक! बिहार निकालावर राज्यात कोण-काय म्हणालं?
सुळेंकडून नितीशबाबूंचं कौतुक! बिहार निकालावर राज्यात कोण-काय म्हणालं?.
भाजप नंबर1 चा पक्ष तरी नितीश कुमार CM होते अन् राहणार, JDUचा मोठा दावा
भाजप नंबर1 चा पक्ष तरी नितीश कुमार CM होते अन् राहणार, JDUचा मोठा दावा.
'ही' 5 कारणं ज्यामुळं बिहारमध्ये NDAची हवा, विजयामागे मोदींचा करिष्मा
'ही' 5 कारणं ज्यामुळं बिहारमध्ये NDAची हवा, विजयामागे मोदींचा करिष्मा.
विजय बिहारमध्ये जल्लोष राज्यात,दादांकडून पेढे तर चव्हाणांनी वाजवला ढोल
विजय बिहारमध्ये जल्लोष राज्यात,दादांकडून पेढे तर चव्हाणांनी वाजवला ढोल.
बिहार कल येताच राऊत म्हणाले; महाराष्ट्र पॅटर्न धक्का बसण्याची गरज नाही
बिहार कल येताच राऊत म्हणाले; महाराष्ट्र पॅटर्न धक्का बसण्याची गरज नाही.
NDA ला बहुमत... भाजपच्या मैथिली ठाकूर 8 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर
NDA ला बहुमत... भाजपच्या मैथिली ठाकूर 8 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर.
निकालापूर्वी कार्यकर्त्याचा जल्लोष, NDAच्या विजयामुळे बिहारमध्ये कल्ला
निकालापूर्वी कार्यकर्त्याचा जल्लोष, NDAच्या विजयामुळे बिहारमध्ये कल्ला.