News9 Global Summit: अभिनेता विवेक ओबेरॉय याने सांगितले कमाईचे जबरदस्त फॉर्म्युले
न्यूज 9 ग्लोबल समिट 2025 मध्ये अभिनेता विवेक ऑबेराय याचा एक बिजनसमन म्हणून वेगळा पैलू समोर आला आहे. तुम्ही काय आहात हे महत्वाचे नसून तुम्ही काय बनू इच्छीता हे तुमच्या हातात आहे असे यावेळी अभिनेता विवेक ऑबेरॉय याने सांगितले.

दुबईत न्यूज 9 ग्लोबल समिटच्या यूएई आवृत्तीची धमाकेदार सुरुवात झाली. यावेळी बॉलीवूड अभिनेता आणि सक्सेसफुल बिझनसमन विवेक ऑबेरॉय यांनी आपले अनुभव मांडले. विवेक ओबेरॉय आज भले चित्रपटात सक्रीय नसला तरी त्याने त्याच्या करियरला एक नवी दिशा दिली आहे. विवेक ऑबेराय याने बिझनसच्या जगात जे यश मिळवले आहे ते एखाद्या फिल्मी कहानीहून कमी नाही. सुमारे १२०० कोटीची संपत्ती असलेल्या विवेक ऑबेराय याच्या कमाईचा मोठा हिस्सा सिनेमा उद्योगाच्या बाहेरुन आला आहे.
BNW रिअल इस्टेट डेव्हलपमेंट्स
विवेक ऑबेरॉय याची सर्वात मोठी आणि चर्चित गुंतवणूक BNW रिअल इस्टेट डेव्हलपमेंट्स. या कंपनीचे सह-संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून विवेक ओबेरॉय युएईमध्ये शानदार आणि आलीशान घराची निर्मिती केली आहे. कंपनीचे आता 23 प्रोजेक्ट्स आहेत. ताज वेग्लिंटन म्युज सारख्या प्रीमियम प्रोजेक्टचा देखील समावेश आहे. BNW ची खासियत म्हणजे झिरो डेब्ट मॉडेल आहे.जो यांना आर्थिक रुपाने मजबूत बनवतो.
बिजनेस केवळ रिअल इस्टेटपर्यंत मर्यादित नाही
विवेक ओबेराय यांच्या बिझनस केवळ रिअल इस्टेटपर्यंत मर्यादीत नाही. त्यांनी ज्वेलरी आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात मजबूत पकड बनविली आहे. डायमंड कंपनीत Solitario भारतात 18 आऊटलेट्स चालवत आहे आणि आता हा ब्रँड लक्झरी मार्केटमध्ये विस्तारत आहे. विवेक ओबेराय याला त्याचे वडिलांकडून स्वयंशीस्त, मेहनत आणि दूरर्शितेचा वारसा मिळाला आहे. या प्रकारे विवेक ओबेरॉय याने हे सिद्ध केले आहे की एक कलाकार जेव्हा ठरवेल तेव्हा तो एक यशस्वी व्यावसायिक बनू शकतो.
जगभरात 30 बिजनस
न्यूज 9 ग्लोबल समिट 2025 मध्ये उद्योगपती विवेक ओबेरॉय याने सांगितले की आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे: पहिली म्हणजे, तुम्ही काय आहात आणि तुम्हाला काय बनायचे आहे. तुम्ही काय आहात ही एक गोष्ट आहे, परंतु तुम्हाला शेवटी काय बनायचे आहे हे खूप महत्त्वाचे आहे. मी जगभरातील 30 व्यवसायांशी संबंधित आहे आणि 12 कंपन्यांशी माझे चांगले संबंध आहेत.परंतु जेव्हा मी बदलाचा विचार करतो तेव्हा मला जाणवते की सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे हेतू. माझे नाव विवेक आहे ( ज्याचा हिंदीमध्ये अर्थ ज्ञान असा आहे ), पण एक वेळ अशी आली जेव्हा मी माझा विवेक गमावला होता. मी माझ्या आतील विवेकाला ऐकणे बंद केले. तुमच्यात तुमची स्वतःची कहाणी लिहिण्याची शक्ती आहे.
