AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit : दुबई कँपसमध्ये सप्टेंबरपासून IIM अहमदाबादचा MBA अभ्यासक्रम, इंडियन एम्बेसडर संजय सुधीर म्हणाले की….

News9 Global Summit: दुबईमध्ये सुरू असलेल्या News9 Global Summit मध्ये एम्बेसेडर संजय सुधीर म्हणाले की, IIFT चा पहिला परदेशी कॅम्पस दुबईमध्ये उघडला जाईल. यावर्षी सप्टेंबरपासून IIM अहमदाबाद दुबई कॅम्पसमध्ये MBA अभ्यासक्रम सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.

News9 Global Summit : दुबई कँपसमध्ये सप्टेंबरपासून IIM अहमदाबादचा MBA अभ्यासक्रम, इंडियन एम्बेसडर संजय सुधीर म्हणाले की....
| Updated on: Jun 19, 2025 | 4:38 PM
Share

News9 Global Summit: दुबईत भरणाऱ्या न्यूज 9 ग्लोबल समीटमध्ये एम्बेसडर संजय सुधीर यांनी सांगितले की आयआयएफटीचा पहिला परदेशी कँपस दुबईत उघडला जात आहे. ते म्हणाले की IIM अहमदाबाद दुबई कँपसमध्ये यावर्षी सप्टेंबरपासून एमबीएचा अभ्यासक्रम सुरु करीत आहे.

देशातील सर्वात मोठा मीडिया ग्रुप TV9 नेटवर्कच्या न्यूज 9 ग्लोबल समिटच्या दुबई एडमिशनचे आयोजन आज, 19 जून रोजी होत आहे. यूएई आणि भारताचे गहीरे संबंध आहेत. आम्ही अनेक गोष्टींवर एकत्र काम करीत आहोत. आम्ही एमओयूवर सह्या केल्या आहेत. आमचे संबंध व्यापारापर्यंतच मर्यादित नाही तर आम्ही एज्युकेशन सेक्टरमध्येही एकत्र काम करीत आहोत असे या समीटमध्ये दुबईतील भारताचे एम्बेसडर संजय सुधीर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की गेल्यावर्षी जानेवारीत आयआयटी दिल्लीच्या अबूधाबी कँपसची सुरुवात झाली आहे. येथे बीटेक, एमटेक आणि पीएचडी कोर्स संचालित केला जात आहे. IIM अहमदाबाद दुबईत आपला पहिला आंतरराष्ट्रीय कँपस उघडत आहे. ज्याचा निर्णय एप्रिल २०२५ मध्ये घेतला होता. कँपसमध्ये यावर्षी सप्टेंबरपासून एमबीए कोर्सचा अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे. लवकरच आयआयएफटीचा कँपस दुबईत देखील उघडला जाणार आहे. आता भारतात IIFT दिल्ली आणि कोलकातात दोन कँपस आहेत.

भारत-यूएई यांचे खास नाते

संयुक्त अरब अमीरातीतील भारताचे राजदूत संजय सुधीर म्हणाले की भारत-यूएई संबंध खूपच खास म्हटले पाहीजेत आणि युएईला भारताचा सर्वात जवळचा भागीदार म्हटले पाहीजे. दुबईत न्यूज 9 ग्लोबल समीटमध्ये बोलताना ते म्हणाले की दोन्ही देशातील संबंध केवळ काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत असे नव्हे तर खोल विश्वास आणि वाढत्या जागतिक प्रभावासह एक व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये देखील विकसित झाले आहे.

द्विपक्षीय संबंधांच्या गहऱ्या नात्यांवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, युएई हा या प्रदेशातील पहिला देश होता ज्याच्यासोबत भारताने 2017 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी करार (CEPA) केला. भारतीय राजदूत म्हणाले की, आज दोन्ही देश व्यवसायासोबत शिक्षण क्षेत्रात एकत्र काम करत आहेत आणि पुढे जात आहेत.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी