आता EPFO खातेधारकांच्या कुटुंबाला मिळणार 15 लाख, काय आहे योजना ?
जर तुम्ही पीएफ खातेधार आहात तर तुम्हाला ही माहीती जाणणे गरजेचे आहे. आता कर्मचारी भविष्य निधी संघटना ईपीएफओने मृत्यू मदत निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या एक्स-ग्रेशिया अमाऊंटमध्ये वाढ केली आहे.

EPFO : जर तुम्ही नोकरदार आहात तर नियमांनुसार तुमचा पीएफ कापला जातो. वास्तविक कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफओद्वारे नोकरपेशा लोकांची पीएफ खाती उघडली जातात. त्यानंतर या पीएफ खात्यात कर्मचाऱ्यांची दर महिन्याला एक निश्चित रक्कम कापून जमा केली जाते. याच बरोबरची रक्कम कंपनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करतात. तसेच या ईपीएफओ वार्षिक व्याज देखील दिले जाते. तसेच आता या दरम्यान एक मोठी बातमी ईपीएफओच्यावतीने आली आहे. त्यात 15 लाखाची रक्कम दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कोणला मिळणार ही 15 लाखाची रक्कम पाहूयात..
कोणत्या बाबीचे मिळणार 15 लाख रुपये?
वास्तविक जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमचे पीएफ खाते असेल तर ईपीएफओने एक मोठे पाऊल उचलत मोठी घोषणा केली आहे. यात कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफओच्यावतीने ‘मृ्त्य मदत कोष’ अंतर्गत दिले जाणाऱ्या एक्स-ग्रेशिया अमाऊंट वाढविली आहे. आणि आता यास वाढवून 15 लाख रुपये करण्यात आला आहे. याआधी एक्स ग्रेशिया अमाऊंट 8.8 लाख रुपये होती.
काय आहे ही एक्स ग्रेशिया अमाऊंट आणि केव्हापासून लागू
ईपीएफओने एक्स ग्रेशिया अमाऊंटला 8.8 लाख रुपयांवरुन वाढवून आता 15 लाख रुपये केली आहे. ही नवीन रक्कम 1 अमाऊंट 1 एप्रिल 2025 लागू केले जाणार आहे. ही अमाऊंट कर्मचाऱ्यांच्या नॉमिनीला मिळते. ज्यांचा मृत्यू सेवेत असताना होतो. त्यांच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते.
कोणाला मिळणार 15 लाख रुपये ?
ही एक्स ग्रेशिया अमाऊंटचे 15 लाख रुपये कोणाला मिळणार आहे ? हे पैसे अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला, कायदेशीर वारसाला वा नॉमिनीला मिळणार जे सेंट्रल बोर्डाचे कर्मचारी आणि ज्यांचे सर्व्हीसच्या दरम्यान निधन होते.
कोठून येणार पैसा आणि का घेतला निर्णय ?
15 लाख रुपये राशन स्टाफ वेल्फेअर फंडातून दिली जाणार आहे. ईपीएफओने देखील सांगितले की या रकमेत 1 एप्रिल 2026 पासून दरवर्षी पाच टक्के वाढ होणार आहे. हा निर्णय केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टींनी घेतला असून यात सरकार, कंपनी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी सामील आहेत. हा निर्णय वाढती महागाई आणि राहणीमानाचा दर्जा यामुळे घरातील कर्ता पुरुष किंवा स्री नाहीशी झाल्यानंतर कुटुंबांना आर्थिक मदतीसाठी घेतला आहे.
