आता तुमच्या विम्याचे पैसे मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार, ICICI कडून नवी सुविधा

हे लक्षात घेता आयसीआयसीआय लोम्बार्ड आपल्या एआय चॅटबॉट @ICICI_Lombard_Bot द्वारे टेलिग्रामवर स्वयं-सेवा सुविधा सुरू करणारी पहिली गैर-जीवन विमा कंपनी बनलीय.

आता तुमच्या विम्याचे पैसे मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार, ICICI कडून नवी सुविधा
ICICI Lombard

नवी दिल्लीः मेसेजिंग हा संवादाचा नवीन मार्ग आहे. व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झालेल्या इन्स्टंट मेसेजिंग ट्रेंडमध्ये ग्राहक विविध प्लॅटफॉर्मवर सामील झालेत. असेच एक व्यासपीठ म्हणजे टेलिग्राम ज्याने अलीकडच्या काळात ग्राहकांमध्ये चांगले स्थान निर्माण केले. टेलिग्रामचे प्लॅटफॉर्म अलिकडच्या महिन्यांत लाखो वापरकर्त्यांना आकर्षित करत आहे, चारपैकी एक भारतीय आजमितीस टेलिग्राम वापरत आहेत. हे लक्षात घेता आयसीआयसीआय लोम्बार्ड आपल्या एआय चॅटबॉट @ICICI_Lombard_Bot द्वारे टेलिग्रामवर स्वयं-सेवा सुविधा सुरू करणारी पहिली गैर-जीवन विमा कंपनी बनलीय.

टेलिग्राम चॅटबॉटवरून ग्राहकांना सोयीस्कर सुविधा

टेलिग्राम चॅटबॉट ग्राहकांना सोयीस्कर सुविधा पुरवतो. जसे की मोटार दाव्याची नोंदणी करणे, दाव्याची स्थिती ट्रॅक करणे, विमा पॉलिसीचे नूतनीकरण, पॉलिसी कागदपत्रे डाऊनलोड करणे, पॉलिसी तपशील सुधारणे इत्यादीची सेवा देते.

व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवरही ‘या’ सुविधा उपलब्ध

त्याचबरोबर आयसीआयसीआय लोम्बार्डने व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवरील त्याच्या सध्याच्या फीचर्समध्ये अनेक सेवा जोडल्यात. नवीन सेवांसह ग्राहक दाव्याची स्थिती, ठराव तसेच कोणत्याही दाव्यासाठी दस्तऐवज अपलोड करण्यास आणि दाव्यास प्रारंभ करण्यासंबंधी त्वरित माहिती मिळवू शकतील. या सेवा सुरू केल्याने विमा कंपनीने ग्राहकांशी सुलभता आणि सहज संवाद सुनिश्चित केलाय. उदाहरणार्थ, मोटर दावा दाखल करण्यासाठी वापरकर्त्याला फक्त वाहन नोंदणी क्रमांक, तारीख आणि वेळ आणि घटनेचे स्थान प्रविष्ट करणे आवश्यक आहे. 7738282666 वर व्हॉट्सअॅपवर संभाषण सुरू करून कोणताही ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतो.

आता विम्याशी संबंधित सर्व काही सोपे होणार

या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ता-अनुकूल सेवा वापरकर्त्यांना संपर्कविरहित पद्धतीने आणि अत्यंत सहजतेने आवश्यक विमा गरजांमध्ये प्रवेश करण्याची अनुमती देणार आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांच्या परस्परसंवादामध्ये आणि सेवेत लक्षणीय बदल झालेत. आजच्या नवीन युगाची ग्राहकांची मागणी आहे की, झटपट उपाय आणि संपर्कविरहित उपाय मिळवा. आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आम्ही सतत वाढत्या ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यास आणि त्यानुसार नावीन्यपूर्ण ऑफर देण्यात आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतोय. आमचे AI सक्षम चॅटबॉट टेलिग्रामवर सादर करण्यात आले आणि व्हॉट्सअॅपवर नवीन सेवा सुरू करणे हे त्या दिशेने एक पाऊल आहे.

या सर्व गोष्टी करू शकतो

मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या विविध सेवांमध्ये क्लेम स्टेटसचा मागोवा घेणे, सक्रिय पॉलिसी डाऊनलोड करणे, विद्यमान विमा संरक्षणाचे नूतनीकरण, पॉलिसीवरील वैयक्तिक माहिती बदलणे इ. ग्राहक जवळच्या आयसीआयसीआय लोम्बार्ड शाखा कार्यालयात ग्राहकाच्या वर्तमान पत्त्यावर आधारित संलग्न रुग्णालये आणि गॅरेज शोधू शकतात.

24 तास मदत मिळणार

आयसीआयसीआय लोम्बार्ड आपल्या उदयोन्मुख ग्राहक वर्गाची पूर्तता करण्यासाठी नवीन युगाचे प्लॅटफॉर्म स्वीकारत आहे. कंपनी त्याच्या iLTechCare अॅपसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे संपर्कविरहित आणि चोवीस तास समर्थन पुरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर करत आहे.

संबंधित बातम्या

ई-कॉमर्स कंपन्यांनो नवीन नियम त्वरित लागू करा, देशातील व्यापाऱ्यांनी उघडला मोर्चा

मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही, मोदी सरकारचा निर्णय

Now your insurance money will be available on the click of a mobile, a new facility from ICICI

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI