AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : परदेशातील नोकरी सोडून भारतात रस्त्यावर विकला चहा; वर्षभरात उभा केला 2 कोटींचा टर्नओव्हर

परदेशातील भरगोस पगाराची नोकरी सोडून एका तरूणाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या रस्त्यांवर त्याने चहा विकला 15 लोकांना रोजगार दिला आणि वर्षभरात 2 कोटींचा टर्नओव्हर उभा केला.

Success Story :  परदेशातील नोकरी सोडून भारतात रस्त्यावर विकला चहा; वर्षभरात उभा केला 2 कोटींचा टर्नओव्हर
CHAI BUSINESSImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 19, 2026 | 4:52 PM
Share

परदेशात नोकरी, चांगला पगार आणि आरामदायी आयुष्य… हे सगळं सोडून एखादा माणूस आपल्या गावी परत येऊन थेट चहाचा व्यवसाय सुरू करू शकतो. याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण राजस्थानातील ओमप्रकाश यांनी मात्र हा धाडसी निर्णय घेतला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर चहाच्या व्यवसायाला मोठं रूप दिलं. आफ्रिकेतील काँगो देशात नोकरी करणाऱ्या ओमप्रकाश यांनी परदेशातील नोकरी सोडली आणि थेट राजस्थान गाठलं. तिथे त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला छोट्या स्तरावर सुरू झालेल्या या व्यवसायाची आज वार्षिक उलाढाल तब्बल 2 कोटी रूपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. त्यांच्या या प्रवासाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.

ओमप्रकाश हे राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील भुरटिया गावचे रहिवासी आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते काँगोमध्ये राहत होते. परदेशात नोकरी करत असल्यामुळ मिळत होते. पण त्याच मन काही तिथं रमत नव्हतं. आपलं स्वत:चं काहीतरी आपण करावं असं सतत वाटत होतं. त्यामुळे त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा अखेर निर्णय घेतला. त्यांनी परदेशातील नोकरी सोडली आणि गावी परतण्याचा निर्णय घेतला.

गावी परतल्यानंतर त्यांनी कोणता व्यवसाय करायचा याबाबत खूप विचार केला. अभ्यास केला शेवटी चहाच्या व्यवसायाची निवड केली. भारतात चहा हे केवळ एक पेय नसून अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. सकाळची सुरूवात असो किंवा मित्रांसोबत गप्पांचा कट्टा, चहाला नेहमीच मागणी असते. हीच गोष्ट ध्यानात घेत ओमप्रकाश यांनी ओमना NRI चायवाला या नावाने आपला व्यवसाय सुरू केला. सुरूवातील व्यवसाय छोट्या स्तरावर होता. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेल्याने त्याचा विस्तार करण्यास सुरूवात केली. आज त्याच बाडमेर शहरात त्यांच्या चहाची 4 आउटलेट आहेत. म्हणजेच एका ठिकाणी सुरू केलेला चहाचा व्यवसाय आज शहरातील वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचला.

या व्यवसायातून ओमप्रकाश यांनी स्वत:साठी उत्पन्नाचा मार्ग तर केलाच, पण इतरांनाही कामाची संधी दिली. त्यांच्या व्यवसायात सुमारे 15 जणांना रोजगार मिळत असल्याची माहिती आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चहाच्या व्यवसायाची आता वार्षिक उलाढाल 2 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे.

परदेशात नोकरी करणाऱ्या अनेकांना तिथेच स्थिरावण्याची इच्छा असते. मात्र ओमप्रकाश यांनी परदेशातील नोकरी सोडून आपल्या गावात व्यवसाय उभारण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की, व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमीच मोठी कंपनी किंवा मोठी गुंतवणूक आवश्यक नसते. ग्राहकांची गरज ओळखून सातत्याने काम केल, तर छोट्या व्यवसायाचाही विस्तार होऊ शकतो. परदेशातील नोकरी सोडून चहाच्या व्यवसायातून 2 कोटींची उलाढाल गाठण्याचा ओमप्रकाश यांचा प्रवास अनेकांसाठी चर्चेचा विषय आहे.

Follow Us
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!