AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल किती झाले कमी, भाव जाणून घ्या एका एसएमएसवर

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलात सातत्याने चढउतार होत असल्याचे तरी गेल्या एक वर्षांपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसत नाही. एका एसएमएसवर जाणून घ्या भाव

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल किती झाले कमी, भाव जाणून घ्या एका एसएमएसवर
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
| Updated on: Jun 23, 2023 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात सातत्याने चढउतार होत आहे. 22 जून रोजी कच्चा तेलाने (Crude Oil Price) उसळी घेतली होती. बेंच मार्क ब्रेंट क्रूड ऑईल 77.04 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 72.47 डॉलर प्रति बॅरल झाला होता. आज 23 जून रोजी या किंमती अनुक्रमे 74.19 डॉलर प्रति बॅरल आणि 69.52 डॉलर प्रति बॅरल झाले. किंमतीत आज घसरण दिसून आली. पण गेल्या वर्षाभरापासून कच्चे तेल स्वस्ताईचा तिळमात्र फायदा भारतीय नागरिकांना मिळालेला नाही. केंद्र, राज्य सरकार आणि तेल कंपन्या मालामाल झाल्या आहेत. देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) आज असा बदल झाला. एक लिटरसाठी खिशाला इतकी झळ बसेल. भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.

सकाळीच होतात भाव जाहीर जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले.

केंद्र आणि राज्य सरकार कमाईतून गब्बर

  1. केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांतील कमाईचे आकडे सादर केले
  2. केंद्र आणि राज्य सरकार दोघांना इंधनाच्या करातून जोरदार फायदा झाला
  3. 2022-23 च्या 9 महिन्यांत 5,45,002 कोटी रुपयांची कमाई पेट्रोलियम उत्पादनातून झाली
  4. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 7,74,425 कोटी, 2019-20 मध्ये 5,55,370 कोटी रुपये
  5. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 5,75,632 कोटी, 2017-18 मध्ये 5,43,026 कोटी रुपये फायदा झाला

तिजोरीत असा येतो पैसा एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून मोठा फायदा होतो. 23 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे असतात. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 19.90 रुपये तर राज्य सरकारला 15.71 रुपये मिळतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.

एक लिटरवर इतका नफा गेल्या वर्षभरापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

भाव एका SMS वर

  • भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  • देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  • त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  • पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  • इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  • बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  • त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  • एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

दरात कपात केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.