PAN Card : पॅन कार्डमध्ये कसा बदलणार आपला फोटो? वाचा संपूर्ण प्रोसेस

अगदी कर्ज घेण्यासापासून ते क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन व्यवहार केला तरी पॅन कार्ड महत्त्वाचं आहे.

PAN Card : पॅन कार्डमध्ये कसा बदलणार आपला फोटो? वाचा संपूर्ण प्रोसेस
अशात अनेक वेळा कार्डवरली फोटो योग्य नसल्यामुळे व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पॅन कार्डवरील फोटो बदलण्याची पद्धती घेऊन आलो आहे.

नवी दिल्ली : भारतात सध्या प्रत्येक कामासाठी पॅन कार्ड (PAN Card) हे एक महत्त्वाचं कागदपत्रं आहे. अगदी कर्ज घेण्यासापासून ते क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन व्यवहार केला तरी पॅन कार्ड महत्त्वाचं आहे. यामध्ये 10-अंकी खाते क्रमांक (Permanent Account number) हा अल्फान्यूमेरिक कोड असतो. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक व्यवहाराची संपूर्ण माहिती पुरवतं. अशात अनेक वेळा कार्डवरली फोटो योग्य नसल्यामुळे व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पॅन कार्डवरील फोटो बदलण्याची पद्धती घेऊन आलो आहे. (pan card news how to change and update photo in pan card)

पॅन कार्डमध्ये फोटो बदलण्यासाठी अशी आहे पद्धत

– सगळ्यात आधी एनएसडीएलच्या (NSDL) अधिकृत वेबसाईटवर जा.

– यानंतर Application Type पर्यायावर क्लिक करा Changes or correction in existing PAN Data ऑप्शन सिलेक्ट करा.

– आता कॅटेगरी मेन्यूमध्ये Individual ऑप्शन निवडा.

– यानंतर सगळी महत्त्वाची कागदपत्रं सबमिट करा.

– आता पॅन अॅप्लिकेशनवर जाऊन KYC पर्यायावर क्लिक करा.

– Photo Mismatch आणि ‘Signature Mismatch असा एक पर्याय तुमच्यासमोर येईल.

– इथे फोटो बदलण्यासाठी Photo Mismatch ऑप्शनवर क्लिक करा.

– आता आई-वडिलांची माहिती भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.

– सर्व माहिती भरल्यानंतर अर्जदार ओळख प्रमाणपत्र, पत्ता पुरावा आणि जन्माचा पुरावा जोडा.

– यानंतर Declaration वर टीक करून Submit बटणावर क्लिक करा

– फोटो आणि सिग्नेचरमध्ये बदल करण्यासाठी अर्ज फी भरावी लागेल. हा शुल्क भारतीयांसाठी 101 रुपये (जीएसटीसह) आणि भारताबाहेरील 1011 रुपये

(जीएसटीसह) आहे.

– पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 15 अंकांची पावती मिळणार.

– अॅप्लिकेशन प्रिंटआउट आयकर पॅन सेवा युनिटला पाठवा.

– पावती क्रमांकाद्वारे अर्जाला ट्रॅक घेतला जाऊ शकतो.

आपण आपल्या पॅन कार्डची कशी पडताळणी कराल?

– आपल्याला अधिकृत प्राप्तिकर वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल.

– त्यानंतर पोर्टलवर आपला पॅन तपशील पडताळणीवर क्लिक करा

– आता तुम्हाला पॅन क्रमांक द्यावा लागेल.

– यानंतर आपले नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल

– आता कॅप्चा कोड भरा.

– आता तपशील पडताळण्यासाठी सबमिटवर क्लिक करा.

इन्स्टंट पॅन कार्ड कसे मिळू शकेल?

– प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड देण्यास सुमारे 10 मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 7 लाख पॅन कार्ड वितरीत करण्यात आली आहेत.

– पॅन कार्ड मिळविण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल

– पॅन कार्ड मिळविण्यासाठी त्या व्यक्तीकडे ओळख, पुरावा आणि जन्मतारीख असणे आवश्यक आहे. या ओळखपत्रांत आपल्याला अनेक पर्याय दिले जातील. या पुराव्यांसाठी आपण एखाद्या कागदपत्राची निवड करू शकता.

पॅन कार्ड विनामूल्य मिळविण्याचा सोपा मार्ग

1. सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.

2. येथे डाव्या बाजूला आपल्याला आधारद्वारे इन्स्टंट पॅनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

3. त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे आपल्याला गेट न्यू पॅनचा पर्याय दिसेल. यावरही क्लिक करा

4. आता नवीन पानावर आपल्याला तुमचा आधार कार्ड क्रमांक देण्यास सांगितले जाईल. आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा आणि ‘आय कन्फर्म’ वर क्लिक करा.

5. आपल्या नोंदणीकृत मोबाईल फोनवर ओटीपी येईल. साईटवर टाकून त्याची पडताळणी करा. (pan card news how to change and update photo in pan

card)

संबंधित बातम्या – 

SBI मध्ये ‘या’ लोकांनी फक्त 5 दिवसात केली 1.24 लाख रुपयांची कमाई, वाचा कशी?

Ratan Tata : 4 वेळा प्रेमात पडलो पण मी मागे हटलो, कारण…; रतन टाटांनी सांगितलं लव्ह लाईफ

SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे

Special Story : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधताय तर ही योजना खास आहे, कमी पैशात मिळेल बक्कळ परतावा

(pan card news how to change and update photo in pan card)

Published On - 12:46 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI