AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट

वाहन निर्मितीसाठी मुलभूत मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळं वाहन पुरवठ्यात घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जानेवारी महिन्यात वाहनांच्या पुरवठ्यात आठ टक्के घट झाल्याचं म्हटलं आहे.

सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाहन उद्योगाला ‘ब्रेक’; ठोक विक्रीत 8 टक्क्यांनी घट
| Updated on: Feb 11, 2022 | 11:50 PM
Share

नवी दिल्ली कोविड प्रकोपामुळं भारतीय वाहन उद्योगाच्या वाढीला ब्रेक बसला होता. कोविड आलेख घसरल्यानंतर ट्रॅकवर येणारा वाहन उद्योगासमोर नवी समस्या उभी ठाकली आहे. वाहन निर्मितीसाठी मुलभूत मानल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळं वाहन पुरवठ्यात घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जानेवारी महिन्यात वाहनांच्या पुरवठ्यात आठ टक्के घट झाल्याचं म्हटलं आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण वाहनांची ठोक विक्री 2,54,287 झाली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात वाहन विक्रीचा आकडा 2,76,554 होता. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यांत 1,26,693 प्रवासी कारच्या (Passenger vehicle) पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत पुरवठ्याचा आकडा 1,53,244 होता.

सेमीकंडक्टर तुटवडा आकड्यांत:

• यूटिलिटी वाहनांची विक्री जानेवारी 2021 मध्ये 1,11,494 होती. जानेवारी 2022मध्ये 1,16,962 वर आकडा पोहोचला. • दुचाकी वाहनांचा पुरवठा 21 टक्क्यांनी घसरुन 11,28,293 वर • तीन चाकी वाहनांची ठोक विक्री घटीसह 24,091 वर. • मारुति सुझुकी पुरवठ्यात दहा हजारांच्या घटीसह 1,28,924 वर. • हुंदाई मोटर इंडियाच्या पुरवठ्यात आठ हजारांच्या घटीसह 52,005 वर.

‘सेमी’तुटवड्याचा ‘लार्ज’ इफेक्ट:

सेमीकंडक्टरचा तुटवडा संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत. विविध निर्मिती कंपन्यांची पानं सेमीकंडक्टर शिवाय हलत नाही. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. वेदांत ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांची कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. या भरीव गुंतवणुकीमुळे देशातील सेमीकंडक्टर उत्पादन वाढणार तर आहेत. त्याचा जागतिक बाजाराला सुद्धा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

सेमीकंडक्टर हब:

देशाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जागतिक महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेसह केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उपकरणांशी संलग्न ७६,००० कोटींच्या प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मान्यता दिली होती. आगामी सहा वर्षांच्या काळात सेमी कंडक्टर निर्मिती कंपन्यांना टप्प्याटप्प्याने हा निधी देण्यात येणार आहे. यामुळे देशांतर्गत सेमीकंडक्टर निर्मितीला चालना मिळण्यासह, चीनवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

क्रिप्टो ट्रॅकर: कर म्हणजे मान्यता नव्हे, क्रिप्टोकरन्सीवर अर्थमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

महाराष्ट्र बनले इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे हब! ठाणे, नाशिक,औरंगाबाद, नागपूरमध्ये 16,775 कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

Video: मराठी पोरं ह्या गुजराती पोराचा आदर्श घेतील का? चहा विकता विकता कोट्याधीश झालेल्या तरुणाला ऐकाच !

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.