Paytm IPO: Paytm च्या IPO मध्ये पैसे कोण आणि कसे गुंतवू शकतो? जाणून घ्या

तुम्ही तुमच्या बँकेद्वारे पेटीएम आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. हा पर्याय सर्वसाधारणपणे बँकेच्या वेबसाईटवर सकाळी 5 ते 11 या वेळेत उपलब्ध असतो. बँकेद्वारे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला या टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

Paytm IPO: Paytm च्या IPO मध्ये पैसे कोण आणि कसे गुंतवू शकतो? जाणून घ्या
IPO
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 5:44 PM

नवी दिल्लीः Paytm IPO opens: एक प्रमुख डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आज उघडलाय. याद्वारे कंपनीने 18,300 कोटी रुपये उभारण्याची योजना आखलीय. कंपनीच्या शेअरची किंमत 2,080-2,150 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलीय. कंपनीचा आयपीओ 10 नोव्हेंबरपर्यंत खुला असेल.

पेटीएमचे मूल्य $16 अब्ज आहे. ही कंपनी 2010 मध्ये सुरू झाली. ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक आहे. One97 Communications चे संस्थापक आणि CEO पेटीएम IPO मध्ये 402 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. आता प्रश्न असा येतो की, तुम्ही पेटीएम आयपीओमध्ये गुंतवणूक कशी करू शकता, त्याच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊया.

? तुमच्या बँकेद्वारे गुंतवणूक करा

तुम्ही तुमच्या बँकेद्वारे पेटीएम आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. हा पर्याय सर्वसाधारणपणे बँकेच्या वेबसाईटवर सकाळी 5 ते 11 या वेळेत उपलब्ध असतो. बँकेद्वारे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला या टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

? सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करा. ? पुढे गुंतवणूक विभागात जा आणि IPO पर्याय निवडा. ? पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची गुंतवणूक आणि बँक खाते तपशील प्रविष्ट करा. ? त्यानंतर तुम्ही ज्या IPO साठी अर्ज करू इच्छिता तो निवडा. ? आता समभागांची संख्या आणि बोलीची किंमत प्रविष्ट करा. ? त्यानंतर अटी व शर्थी दस्तऐवज वाचा आणि स्वीकारा. ? शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा.

? पेटीएम मनी अॅपद्वारे करा गुंतवणूक

? तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पेटीएम मनी अॅपद्वारे आयपीओसाठी अर्ज करू शकता. ? सर्वप्रथम पेटीएम मनी अॅपमध्ये लॉगिन करा. ? तेथे होम स्क्रीनवर IPO विभागावर क्लिक करा. ? आयपीओसाठी अर्ज करा जो अर्जांसाठी खुला आहे. ? पुढे बोलीसाठी तपशील प्रविष्ट करा जसे की प्रमाण, रक्कम इ. ? त्यानंतर पेमेंट करण्यासाठी UPI आयडी देखील प्रविष्ट करा.

? Zerodha च्या अॅपद्वारे करा गुंतवणूक

तुम्ही Zerodha’s Kite ऍप्लिकेशनद्वारे देखील अर्ज करू शकता. हे मोबाईल अॅप स्टॉक आणि कमोडिटीच्या व्यापारासाठी आहे. सर्वप्रथम मोबाइल अॅपवर लॉगिन करा आणि IPO पर्याय निवडा. तुम्ही डेस्कटॉपद्वारे लॉगिन करत असल्यास कन्सोलवर जा. त्यानंतर पोर्टफोलिओ आणि IPO वर जा. तुम्हाला गुंतवणुकीसाठी खुले असलेल्या IPO ची यादी दिसेल. तुम्हाला ज्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची आहे तो निवडा. BHIM अॅपद्वारे तुमचा UPI आयडी प्रविष्ट करा. तुमचा UPI आयडी तुमच्या वैयक्तिक बँक खात्याशी जोडलेला असल्याची खात्री करा. तुमच्या अर्जासाठी गुंतवणूकदाराचा प्रकार निवडा.

? किरकोळ गुंतवणूकदार तीन लॉटसाठी बोली लावू शकतात

कंपनीने घोषित केलेला लॉट आकार (एका लॉटमध्ये खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर्सची संख्या) प्रविष्ट करा. शेअर्सच्या वाटपाच्या चांगल्या अपेक्षेसाठी कट ऑफ प्राईसवर टिक करा, कारण हे सूचित करते की गुंतवणूकदाराला किंमत बँडमध्ये कोणत्याही किमतीला शेअर्सचे सदस्यत्व घ्यायचे आहे. कट ऑफ किंमत ही जारी किंमत आहे. किरकोळ गुंतवणूकदार तीन लॉटसाठी बोली लावू शकतात. पुढे पुष्टी करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा. शेवटी IPO मधील गुंतवणुकीसह पुढे जाण्यासाठी आदेश विनंती मंजूर करणे आवश्यक आहे. एकदा, तुम्ही आदेश स्वीकारल्यानंतर IPO साठी निधीची रक्कम वाटप होईपर्यंत ब्लॉक केली जाईल.

संबंधित बातम्या

घर खरेदीदारांना धक्का, ‘या’ बँकेने गृहकर्जाचे व्याजदर वाढवले, पटापट तपासा

ank FD: आता 3 वर्षांच्या फिक्स्डवर मिळवा 7 टक्के व्याज, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.