Petrol & Diesel: पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

Petrol and diesel rates | देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सध्याची परिस्थिती बघता लवकरच डिझेलही शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.

Petrol & Diesel: पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर
पेट्रोल आणि डिझेल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jun 16, 2021 | 12:28 PM

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काल पेट्रोल (Petrol price) आणि डिझेलचे दर स्थित होते. मात्र, मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या  दरात (Diesel Price) 13 पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता मुंबईत पेट्रोलची किंमत 102 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत प्रतिलीटर 94.84 रुपये इतकी झाली आहे. (Petrol and diesel price today 16 June 2021)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर भरभर वाढायला सुरुवात झाली होती. सोमवारी झालेली दरवाढ ही गेल्या सहा आठवडय़ांतील 25 वी दरवाढ असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सध्याची परिस्थिती बघता लवकरच डिझेलही शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 102.82 प्रतिलिटर

ठाणे – 102.95प्रतिलिटर

पुणे – 102.42 प्रतिलिटर

नागपूर – 105.60 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 102.56 प्रतिलिटर

कोल्हापूर – 102.93 प्रतिलिटर

परभणी – 105.16 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

संबंधित बातम्या:

Petrol and diesel price: देशभरात इंधन दरवाढीची ‘साथ’; मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

(Petrol and diesel price today 16 June 2021)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें