Petrol Diesel Price: पुढच्या महिन्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ओपेक + देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्टपासून तेलाचा पुरवठा वाढविला जाईल, असा रविवारी एकत्रितपणे निर्णय घेतला. 

Petrol Diesel Price: पुढच्या महिन्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय
पेट्रोल-डिझेल

नवी दिल्लीः Petrol Diesel Price: येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ओपेक प्लस देशांनी मिळून ऑगस्ट महिन्यापासून तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतलाय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ओपेक + देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्टपासून तेलाचा पुरवठा वाढविला जाईल, असा रविवारी एकत्रितपणे निर्णय घेतला.

खरं तर कोरोना संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्था वेगाने सुधारली, ज्यामुळे तेलाची मागणीही वाढली. उत्पादन मर्यादित असल्यामुळे या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. या आठवड्यात कच्च्या तेलाची बंद किंमत प्रति बॅरल 73.14 होती. जुलै महिन्यात ही पातळी 78 डॉलरपर्यंत पोहोचली. मासिक तत्त्वावर तीन महिन्यांच्या सतत वाढीनंतर कच्च्या तेलामध्ये या महिन्यात जवळपास 2 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

10 मिलियन बॅरलमध्ये कपात

आजच्या बैठकीत ओपेक देशांव्यतिरिक्त रशियासारख्या अन्य तेल उत्पादक देशही होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ओपेक प्लस देशांनी गेल्या वर्षी दररोज 10 मिलियन बॅरेल्स उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यात वाढ करण्यात आली. दररोज त्यात 5.8 मिलियन बॅरलने कपात केली होती.

दरमहा 4 लाख बॅरल्सची वाढ होते

ओपेक + देश एकत्रितपणे दरमहा दररोज 4 लाख बॅरल उत्पादन वाढवतील, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. याची सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली. सध्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दिवसाला 8 लाख बॅरल उत्पादन वाढेल. या हिशेबानुसार ऑक्टोबरमध्ये उत्पादन दररोज 12 लाख बॅरल, नोव्हेंबरमध्ये दररोज 16 लाख बॅरल तर डिसेंबरमध्ये दररोज 20 लाख बॅरल असेल. आज युएई आणि सौदी अरेबियामधील करारानंतरच उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्पादन वाढविण्याची संधी सर्व देशांना देण्यात आली.

जुलैमध्ये पेट्रोल 9 वेळा महागले

जुलैमध्ये आतापर्यंत पेट्रोलच्या किमतीत 9 पट वाढ करण्यात आली. तर डिझेल 5 पट महाग आणि एकदा स्वस्त झाले. याआधी जून आणि मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 16 पट वाढ करण्यात आली होती. देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोलची किंमत 113.21 रुपये, तर डिझेलची किंमत 103.15 रुपये आहे. त्याचबरोबर, अनुपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोलने 17 राज्यात 100 रुपयांची किंमत ओलांडली

देशातील 17 राज्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपये किंवा त्याहून अधिक झालीय. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, पुडुचेरी, दिल्ली आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. भोपाळ देशातील एका राज्यातील पहिली राजधानी होती, जिथे पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली होती.

संबंधित बातम्या

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

Petrol Diesel Price: Petrol-diesel to be cheaper from next month; OPEC + countries made a big decision

Published On - 6:10 am, Mon, 19 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI