Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय?

महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही 90 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. (Petrol Diesel Price Today 14 May 2021)

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय?
Petrol Diesel Price

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही 90 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. (Petrol Diesel Price Today 14 May 2021)

मुंबईकरांचे आर्थिक गणित बिघण्याची शक्यता

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लाॅकडाऊनमध्ये पुन्हा महागाईचा भडका उडाला आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 98.65 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. तर डिझेलचा दर प्रतिलीटर 90.18 रुपये इतका आहे. मुंबईत आज पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 36 पैशांनी महागलं आहे. तसेच पॉवर पेट्रोलचा दर हा  102.58 रुपये इतका पाहायला मिळत आहे.

मुंबईत गेल्या आठ दिवसात सहा वेळा दरवाढ आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल शंभरी पार करेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला होता. मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे 12 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. पण आता पुन्हा महामारीच्या काळात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील पेट्रोलची शंभरी गाठणारे जिल्हे कोणते? 

  • अमरावती – ₹ 100.01
  • बीड –  ₹ 100.08
  • गोंदिया – ₹ 100.06
  • जालना – ₹ 100.15
  • लातूर – ₹ 100.11
  • नांदेड – ₹ 100.22
  • परभणी – ₹ 100.59
  • रत्नागिरी – ₹ 100.10
  • सिंधुदुर्ग – ₹ 100.15
  • यवतमाळ – ₹ 100.06

(Petrol Diesel Price Today 14 May 2021)

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 98.40 ₹ 88.51
2 अकोला ₹ 98.50 ₹ 88.63
3 अमरावती ₹ 100.01 ₹ 90.08
4 औरंगाबाद ₹ 99.83 ₹ 91.30
5 भंडारा ₹ 99.41 ₹ 89.50
6 बीड ₹ 100.08 ₹ 90.14
7 बुलडाणा ₹ 99.42 ₹ 89.51
8 चंद्रपूर ₹ 98.55 ₹ 88.69
9 धुळे ₹ 98.52 ₹ 88.63
10 गडचिरोली ₹ 99.77 ₹ 89.85
11 गोंदिया ₹ 100.06 ₹ 90.13
12 मुंबई उपनगर ₹ 98.70 ₹ 90.16
13 हिंगोली ₹ 99.64 ₹ 89.72
14 जळगाव ₹ 99.81 ₹ 89.86
15 जालना ₹ 100.15 ₹ 90.19
16 कोल्हापूर ₹ 98.99 ₹ 89.09
17 लातूर ₹ 100.11 ₹ 90.16
18 मुंबई शहर ₹ 98.65 ₹ 90.11
19 नागपूर ₹ 98.46 ₹ 88.58
20 नांदेड ₹ 100.22 ₹ 90.27
21 नंदूरबार ₹ 99.46 ₹ 89.54
22 नाशिक ₹ 99.06 ₹ 89.10
23 उस्मानाबाद ₹ 99.17 ₹ 89.26
24 पालघर ₹ 98.45 ₹ 88.52
25 परभणी ₹ 100.59 ₹ 90.61
26 पुणे ₹ 99.13 ₹ 89.20
27 रायगड ₹ 98.49 ₹ 88.56
28 रत्नागिरी ₹ 100.10 ₹ 90.14
29 सांगली ₹ 98.52 ₹ 88.64
30 सातारा ₹ 99.42 ₹ 89.48
31 सिंधुदुर्ग ₹ 100.15 ₹ 90.21
32 सोलापूर ₹ 98.63 ₹ 88.74
33 ठाणे ₹ 98.18 ₹ 88.26
34 वर्धा ₹ 98.98 ₹ 89.09
35 वाशिम ₹ 99.17 ₹ 89.27
36 यवतमाळ ₹ 100.06 ₹ 90.13

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

(Petrol Diesel Price Today 14 May 2021)

संबंधित बातम्या : 

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांना दोन महिन्यांत मिळणार चांगली बातमी, DA मध्ये मोठी वाढ अपेक्षित