Business Idea | दर महिना 70 हजारांहून अधिक कमाई करायची, मग लवकर सुरु करा ‘हा’ बिझनेस, सरकारकडून 70 टक्के कर्ज

कोणतीही व्यक्ती नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकते. हे कर्ज त्यांच्या व्यवसायातून उत्पन्न मिळाल्यानंतर हप्त्यांमध्ये परत केले जाऊ शकते. (PM Mudra Loan Yojana Dairy Business project Idea)

Business Idea | दर महिना 70 हजारांहून अधिक कमाई करायची, मग लवकर सुरु करा 'हा' बिझनेस, सरकारकडून 70 टक्के कर्ज
Money

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार सर्वसामान्यांना नवीन व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या मदतीने कोणतीही व्यक्ती नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकते. हे कर्ज त्यांच्या व्यवसायातून उत्पन्न मिळाल्यानंतर हप्त्यांमध्ये परत केले जाऊ शकते. केंद्राच्या मुद्रा योजनेमुळे आतापर्यंत असंख्य लोकांना मदत मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेच्या सहाय्याने दुग्ध व्यवसाय सुरू करण्याबद्दलची माहिती देणार आहोत. (PM Mudra Loan Yojana Dairy Business project Idea)

देशभरात दूध व त्याच्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करुन तुम्हाला दर महिना 70 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. विशेष म्हणजे दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायासाठी तुम्हाला बऱ्याच स्त्रोतांची आवश्यकता नसते. तुम्ही काही ठराविक पैशातही हा व्यवसाय सुरु करु शकता.

सुरुवातीचा खर्च किती?

पंतप्रधान मुद्रा योजनेत या व्यवसायासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोफाईलनुसार, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण 16.5 लाख रुपये खर्च येतो. यातील केवळ 5 लाख रुपयांची व्यवस्था तुम्हाला स्वत:ला करावी लागेल. त्यानंतर व्यवसायासाठी उर्वरित 70 टक्के रक्कम ही तुम्हाला मुद्रा योजनेंतर्गत मिळेल. या योजनेनुसार, तुम्हाला बँकेकडून मुदतीच्या कर्जासाठी 7.5 लाख रुपये आणि कार्यरत भांडवल म्हणून 4 लाख रुपये मिळतील.

स्वत: चा दुग्ध व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्ही त्यात दूध, दही, ताक यांसह इतर दुग्धजन्य पदार्थांची विक्री करु शकतो. हे पदार्थ तुम्ही स्वत: तयारही करु शकतो. तसेच दूधाचा वापर करुन बनवण्यात येणारे इतर पदार्थही तुम्ही तयार करुन विक्रीस ठेवू शकता.

कच्च्या मालाची आवश्यकता 

या व्यवसाय योजनेंतर्गत तुम्हाला एका महिन्यासाठी कच्चा माल म्हणून जवळपास 12 हजार 500 लीटर कच्चे दूध आवश्यक आहे. याशिवाय सुमारे एक हजार किलो साखर आवश्यक असेल. कच्च्या दुधापासून तयार करण्यात येणारे उत्पादनांसाठी तुम्हाला 200 किलो फ्लेवर आणि 625 किलो मसाला आणि मिठाची व्यवस्था करावी लागेल. यासाठी तुम्हाला दरमहिना जवळपास 4 लाख रुपये खर्च येतो.

किती जागा आवश्यक?

या व्यवसायासाठी तुम्हाला कमीतकमी एक हजार चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. यातील 500 चौरस फूट जागा ही प्रक्रिया क्षेत्रासाठी वापरली जाईल. तर 150 चौरस फूट रेफ्रिजरेशन रूम, 150 चौरस फूट जागा साफसफाईसाठी, 100 चौरस फूट जागा ऑफिस आणि उर्वरित 100 चौरस फूट जागा ही शौचालयासह इतर सुविधांसाठी आवश्यक आहे.

नफा किती?

हा दुग्ध व्यवसाय सुरू केल्यावर तुम्ही वर्षभरात जर 82.50 दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली तर तुम्हाला 74.40 लाख खर्च येतो. म्हणजे जर तुम्ही खर्च वजा केलात तर तुम्हाला दर वर्षाला साधारण 8.10 केवळ नफा होईल.

(PM Mudra Loan Yojana Dairy Business project Idea)

संबंधित बातम्या : 

बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या? व्याजदर किती, जाणून घ्या

1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?

नाणं छोटसंच, पण विकताना खणखणीत वाजलं; 138 कोटीला विक्री; वाचा खासियत!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI