AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story | गॅरेजमध्ये उघडला कारखाना, आज आहे 75,000 कोटींची कंपनी

भारतातील अनेक उद्योजक घराणी प्रसिद्ध आहेत. काहींनी अगदी शुन्यातून सुरूवात करीत आपले उद्योगसाम्राज्य उभे केले आहे. आज भारतातील आघाडीची इलेक्ट्रीक उपकरणे बनविणाऱ्या या कंपनीची सुरुवात एका गॅरेजमधून झाली होती हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

Success Story | गॅरेजमध्ये उघडला कारखाना, आज आहे 75,000 कोटींची कंपनी
Inder Jaisinghani Image Credit source: socialmedia
| Updated on: Nov 04, 2023 | 2:27 PM
Share

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : शून्यातून आपले विश्व उभारणारे खूप कमी आहेत. भारतात 20 ते 30 वर्षांत अनेक अब्जाधीश उद्योगपतींचा उदय झाला आहे. यातील अनेकांना कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. यातच पॉलीकॅब इंडीयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर जयसिंघानी यांनी आपले विश्व उभे केले आहे. फोर्ब्ज इंडियाच्या 2023 च्या 100 भारतीयाच्या यादीत इंदर जयसिंघानी 32 व्या स्थानावर आहेत. परंतू हे स्थान गाठण्यासाठी त्यांना अत्यंत गरीबीतून वर यावे लागले.

इंदर जयसिंघानी यांच्या वडील ते 15 वर्षांचे असताना वारले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मोठा भावासोबत त्यांच्या कौटुंबिक व्यवसाय करण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर दोन लहान भाऊ-बहिण त्यांच्या सोबत व्यवसायात मदत करू लागले. प्रचंड मेहनतीनंतर त्यांनी 1983 मध्ये पॉलीकॅब कंपनीची सुरुवात केली. जी आज देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीकल उपकरणे बनविणारी कंपनी बनली आहे. या कंपनीची सुरुवात 1000 चौरस फूटाच्या छोट्या गॅरेजमधून झाली होती.

गॅरेजमध्ये उघडली कंपनी

इंदर जयसिंघानी यांनी 1000 चौरस फूटाच्या जमीनीवर वर्कशॉप उघडले आणि केबल वायर तयार करण्यास सुरुवात केली होती. इंदर जयसिंघानी यांनी कंपनीचे मार्केटींग आणि विक्रीचे काम सांभाळले. आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत आज हे स्थान मिळविले. 2008 मध्ये इंदर जयसिंघानी यांना मोठे यश मिळाले. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने पॉलीकॅबमध्ये भागीदारी केली. त्यानंतर कंपनीचा व्यवसाय वाढतच गेला. 2014 मध्ये पॉलीकॅबने केबल वायर शिवाय अनेक उत्पादने इलेक्ट्रीक फॅन, स्विच आणि एलईडी लायटींगमध्ये उतरत उत्पादने सुरु केली.

एका वर्षांत संपत्ती डबल

2019 मध्ये पॉलीकॅब शेअर बाजारात लिस्टेड झाली. त्यानंतर कंपनीची प्रचंड यश मिळविले. आज पॉलीकॅब इंडीयाचे बाजारमूल्य 75,000 कोटीहून अधिक आहे. इंदर जयसिंघानी यांची एकूण संपत्ती एका वर्षात वाढून दुप्पट झाली आहे. 2023 जयसिंघानी यांची संपत्ती 6.4 अब्ज डॉलर म्हणजेच 53,000 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये त्यांची संपत्ती 3.35 अब्ड डॉलर होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.