Kisan Vikas Patra : एक हजारांची बचत 10 वर्षात रक्कम दामदुप्पट, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये

Post office saving schemes: पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये किसान विकास पत्राचाही समावेश आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात

Kisan Vikas Patra : एक हजारांची बचत 10 वर्षात रक्कम दामदुप्पट, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये
अल्पबचत पण गुंतवणूक दामदुप्पटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 10:50 AM

टपाल खात्यातील अल्पबचत गुंतवणूक योजना तुम्हाला बचतीची सवय तर लावतेच पण एका निर्धारीत कालावधीत उद्दिष्ट गाठण्यासाठी ही मदत करते. येत्या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणूक योजनांमध्ये (Saving Scheme) तुम्ही गुंतवणूक करू शकता. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत (Post Office Small Savings Scheme) तुम्हाला हमखास परताव्याची संधी मिळते. तसेच या गुंतवणुकीवर कसली ही जोखीम नाही. त्यामुळे सुरक्षित परताव्यासाठी (Return) या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. टपाल खात्यातंर्गत मुदत ठेव योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. तसेच टपाल आवर्ती जमा खाते अर्थात आरडी आणि पीपीएफ या योजना देखील आहेत. यातील किसान विकास पत्र योजना आहे. यात गुंतवणूक केले पैसे दुप्पट करण्याची सोय आहे. किसान विकास पत्र (Kisan Vikas patra) या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांची संख्या मोठी आहे. गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते. यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे.

रक्कमेला सरकारची गॅरंटी

देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे. बँक दिवाळखोरीत गेली तर ग्राहकाला किती ही गुंतवणूक केली असली तरी केवळ 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. पोस्ट खात्यात दिवाळखोरीचा कोणताच विषय नसल्याने येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत वार्षिक 6.9 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या अल्पबचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम 14 महिन्यांत म्हणजे 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतील.

हे सुद्धा वाचा

किमान 1000 रुपयांची गुंतवणूक

किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकते. या योजनेत तुम्हाला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

खाते कोण उघडू शकेल?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक प्रौढ आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत पालक अल्पवयीन अथवा बाळबोध, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.तसेच या योजनेत खाते हस्तांतर करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अथवा सह खातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत करता येते.

योजनेचा कालावधी

या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

मॅच्युरिटीपूर्वी खाते करा बंद

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.