शेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला
खाद्यतेल

Edible Oils | केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, मोहरीच्या तेलात कोणतीही भेसळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोहरीच्या तेलात सोयाबीन डीगमच्या तेलाचा मोठ्याप्रमाणावर समावेश होतो. मात्र, अशाप्रकारच्या भेसळीवर बंदी घातल्याने मोहरीच्या तेलाचा दर वाढला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jun 21, 2021 | 10:46 AM

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे भारतामध्ये सोयाबीन, मोहरी, तीळ आणि पामतेलाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. तेलाच्या भावात तेजी आल्यामुळे सध्या सोयाबीन डीगमच्या प्रतिक्विंटल दरात 40 रुपये, सीपीओच्या दरात 30 रुपये, पामोलीना दिल्ली आणि पामोलीना कांडलाचा भाव प्रतिक्वंटल 50 रुपयांनी वाढला आहे. तर दुसरीकडे बाजारपेठांमध्ये मोहरीची आवक कमी झाल्याने या तेलाचा दरही वाढला आहे. (Edibile oil rates increased good news for farmers)

केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, मोहरीच्या तेलात कोणतीही भेसळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोहरीच्या तेलात सोयाबीन डीगमच्या तेलाचा मोठ्याप्रमाणावर समावेश होतो. मात्र, अशाप्रकारच्या भेसळीवर बंदी घातल्याने मोहरीच्या तेलाचा दर वाढला आहे.

केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुक्ल घटवले

मोदी सरकारने पाम तेलासह (Palm Oil) विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन 8000 रुपयांची (112 डॉलर्स) कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या मासिक खर्चाचा ताळमेळ बिघडला होता. भारताकडून 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत होता. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे 86 डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन 37 डॉलरची कपात केली आहे. तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे 112 डॉलर्सनी घटवण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.

मोहरीच्या उत्पादनाची विक्रमी नोंद

भारतात यावेळी मोहरीचे पीक खूप चांगले आले आहे. अशा परिस्थितीत सरकार विक्रमी उत्पादनाचा अंदाज लावते. तथापि, विक्रमी उत्पादनाचा दरावर परिणाम होत नाही आणि मोहरीची विक्रमी किंमतीवर विक्री होत आहे. राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नैम) अर्थात ऑनलाईन मार्केटच्या मते 25 मार्च रोजी राजस्थानच्या चाकसू मंडईमध्ये मोहरीचा भाव प्रतिक्विंटल 6,781 रुपये होता. दुसरीकडे, भरतपूर मंडईमध्ये याचा सरासरी दर 5500 रुपये क्विंटल सुरू आहे. शेतकरी सरकारला विक्री करण्याऐवजी थेट व्यापाऱ्यांना मोहरी विकत आहेत कारण त्यांना चांगला भाव मिळत आहे.

संबंधित बातम्या:

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

(Edibile oil rates increased good news for farmers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें