AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीझेल वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेट्रोल पंपांवर स्टॉक संपण्याची वेळ; खरेदीवर मर्यादा, कंपन्यांचा मोठा निर्णय

Diesel Sale Restrictions: देशात डिझेल खरेदीबाबत नवीन बदल होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास येत्या काही दिवसांत त्यावर मर्यादा घातली जाऊ शकते.

डीझेल वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेट्रोल पंपांवर स्टॉक संपण्याची वेळ; खरेदीवर मर्यादा, कंपन्यांचा मोठा निर्णय
| Updated on: Sep 29, 2026 | 4:00 PM
Share

मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे इंधन पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. यामुळे आता देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही काळापासून चढ-उतार होत आहे. जर तुमचे वाहन डिझेलवर चालत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही पेट्रोल पंपावर केवळ एका निश्चित मर्यादेतच डिझेल खरेदी करू शकता. यापूर्वी ग्राहक त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करत होते. परंतु आता काही खाजगी इंधन कंपन्यांनी ते खरेदी करू शकणाऱ्या डिझेलच्या प्रमाणावर मर्यादा घातल्या आहेत.

डिझेलच्या कमी किमतींमुळे मोठे ग्राहकसुद्धा किरकोळ पेट्रोल पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करत आहेत. यामुळे आता पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा कमी होत आहे. प्रश्न असा आहे की, घाऊक आणि किरकोळ डिझेलच्या किमतींमध्ये हा फरक कसा निर्माण झाला? या समस्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेट्रोल पंप आणि घाऊक ग्राहकांना उपलब्ध असलेल्या डिझेलच्या दरांमधील तफावत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमतही प्रति बॅरल सुमारे १०८ डॉलरवर पोहोचली आहे.

असे असूनही मे महिन्यापासून किरकोळ पेट्रोल पंपांवर इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यासोबतच घाऊक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार ठरवले जात आहेत. रिटेल आणि घाऊक डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर सुमारे ४० रुपयांचा फरक दिसून आला आहे. यामुळेच मोठे ग्राहक स्वस्त डिझेल खरेदी करण्यासाठी रिटेल पंपांवर गर्दी करत आहेत. कमी किमतींमुळे ते त्यांच्या गरजेचा मोठा भाग रिटेल पंपांवरूनच खरेदी करत आहेत. ज्यामुळे डिझेलचा साठा वेगाने संपण्याचा दबाव येत आहे.

म्हणूनच वाढलेल्या मागणीमुळे जिओ-बीपी आणि नायरा एनर्जीने त्यांच्या रिटेल पंपांवर डिझेल खरेदीवर मर्यादा निश्चित केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नायरा एनर्जीने आपल्या आउटलेट्सवर डिझेल खरेदीवर मर्यादा घातली आहे. ग्राहकाला दररोज जास्तीत जास्त ७० ते २०० लिटर डिझेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. जिओ-बीपी पेट्रोल पंपांनीही ग्राहकाला दररोज खरेदी करता येणाऱ्या डिझेलचे प्रमाण ५० लिटरपर्यंत मर्यादित केले आहे.

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...