AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Gold Rate | पुण्यात सोन्याची झळाळी 50 हजारांच्या पार, चांदीच्या दरात घसरण कायम, काय आहेत आजचे दर?

काल 50 हजारांच्या उंबरठ्यावर असलेल्या सोन्याने आज अखेर पुण्यात 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सोनं 50 हजारांच्या पार जाणार असा अंदाज होता. तो खरा ठरला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ होऊन प्रतितोळा दर 45,990 रुपयांवर गेलं आहे.

Pune Gold Rate | पुण्यात सोन्याची झळाळी 50 हजारांच्या पार, चांदीच्या दरात घसरण कायम, काय आहेत आजचे दर?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 11:25 AM
Share

पुणे : काल 50 हजारांच्या उंबरठ्यावर असलेल्या सोन्याने आज अखेर पुण्यात 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 50 हजार 160 रुपयांवर गेला आहे. काल हा दर 49,920 होता. त्यामुळे आज सोनं 50 हजारांच्या पार जाणार असा अंदाज होता. तो खरा ठरला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ होऊन प्रतितोळा दर 45,990 रुपयांवर गेलं आहे. (Gold has finally crossed the Rs 50,000 mark for 10 grams of gold in Pune today)

काही दुकानांमध्ये ऑनलाईन सोन्याचा दर हा 24 कॅरेटसाठी प्रतितोळा 49,450 रुपयांच्या दरम्यान आहे. तर 22 कॅरेटसाठी 45,490 रुपयांदरम्यान आहे. यामध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतात.

चांदीच्या दरात घसरण कायम

काल चांदीच्या दरात झालेली घसरण आजही कायम आहे. कालप्रमाणे आजही चांदीच्या दरात 200 रूपयांची घसरण पहायला मिळाली. आज पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार आहे. काल हा दर 63 हजार 200 रुपये होता.

तीन-चार दिवस चांदीच्या दरात विक्रमी वाढ

परवा पुण्यात चांदीच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली होती. परवा पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार 400 रुपयांवर गेला होता. तर त्याआधी हा दर 62 हजार 800 रूपयांच्या घरात होता. मंगळवारी पुण्यात चांदीच्या दरात प्रतिकिलो 800 रुपयांची वाढ झाली होती तर सोमवारी 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांत चांदीचा दर तब्बल 1700 रुपयांनी वाढला होता. मागच्या अनेक दिवसांतली ही मोठी वाढ आहे.

सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचे फायदे

अडीअडचणीच्या प्रसंगात घरात सोने असल्यास ते गहाण ठेवून कर्ज घेणे हा खूप मोठा आधार ठरू शकतो. तुम्हाला तातडीने पैसे हवे असल्यास सोने तारण कर्जासारखा पर्याय नाही. हे कर्ज मिळवण्यासाठी इतर कर्जांच्या तुलनेत कमी प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरते. सोन्याचे दागिने 18 कॅरेटपेक्षा जास्तीचे असतील तरच त्यावर कर्ज मिळते. हे कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसते. तसेच कर्जाच्या पैशांचा वापर कशासाठी करणार, हे सांगणेही बंधनकारक नसते.

सोने तारण ठेवून कर्ज घेताना काय काळजी घ्याल?

सोने तारण ठेवून कर्ज घेताना संबंधित बँक आणि वित्तीय संस्थेकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदाराची माहिती घ्यावी. बँक कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आकारत नाही ना, याची खातरजमा करुन घ्यावी. याशिवाय, प्री-पेमेंट, प्रोसेसिंग फी, री-पेमेंट चार्ज हा सगळा तपशील तपासून घ्यावा.

संबंधित बातम्या :

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.