AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata Family Tree : रतन टाटा यांच्या कुटुंबात कोण-कोण? अशी आहे त्यांची Family Tree

Ratan Tata Family Tree : रतन टाटा यांचं कुटुंब प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच लांब राहिलय. त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहितीय. रतन टाटा अविवाहीत होते. रतन टाटा यांचे वडिल, आजोबा, पणजोबा कोण होते? त्यांच्या कुटुंबात आता किती सदस्य आहेत, जाणून घ्या Family Tree बद्दल.

Ratan Tata Family Tree : रतन टाटा यांच्या कुटुंबात कोण-कोण? अशी आहे त्यांची Family Tree
Ratan Tata
| Edited By: | Updated on: Oct 10, 2024 | 12:43 PM
Share

टाटा ग्रुप देशातीलच नाही, जगातील मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. या समूहातील प्रतिभाशाली रत्न म्हणजे रतन टाटा. त्यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. रतन टाटा हे दूरदृष्टीच नेतृत्व होतं. टाटा समूह म्हणजे देशाच्या विकासाप्रती समर्पणाचा भाव. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाचा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तार झाला. अनेकांच्या आयुष्यांवर त्यांनी प्रभाव टाकला. रतन टाटा यांचं जाणं हे एका युगाचा शेवट आहे. पण त्यांचा प्रभाव येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. फार कमी लोकांना रतन टाटा यांच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य नेहमी प्रकाश झोतापासून लांब राहिले. रतन टाटा यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे? जाणून घेऊया.

जमशेद जी टाटा कोण?

जमशेद जी टाटा हे रतन टाटांचे पणजोबा. त्यांचं हीराबाईंसोबत लग्न झालं. डोराभ जी टाटा आणि रतनजी टाटा ही त्यांची दोन मुलं. जमशेद जी यांनी 1868 साली भारतातील सर्वात मोठा टाटा ग्रुप आणि जमशेदपूर शहराची स्थापना केली. जमशेद जी यांचा नवसारीमध्ये एका पारसी कुटुंबात जन्म झालेला. त्यांनी मुंबईत एका एक्सपोर्ट ट्रेडिंग फर्मची सुरुवात केली. तो आपल्या कुटुंबातील पहिले बिजनेसमॅन होते.

जमशेद जी टाटा यांचे सुपूत्र डोराभ जी टाटा बिजनेसमॅन होते. 1904 ते 1928 पर्यंत ते टाटा ग्रुपचे चेयरमन होते. डोराभ जी टाटा यांचं लग्न मेहरबाईशी झालं. 1896 मध्ये दोघांचं लग्न झालं. पण त्यांना मुलबाळ नव्हतं.

रतन टाटांचे आजोबा रतन जी दादा टाटा

जमशेद जी टाटा यांचे दुसरे सुपूत्र रतन जी दादा टाटा. 1856 मध्ये नवसारी येथे रतन जी दादा टाटा यांचा जन्म झाला. 1928 ते 1932 ते टाटा ग्रुपचे चेयरमन होते. त्यांनी सुनी नावाच्या फ्रान्सच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. तिचं नाव होतं नवजबाई. 1892 साली दोघे विवाह बंधनात अडकले. या दोघांना सुद्धा मुलबाळ नव्हतं. त्यांनी एक मूल दत्तक घेतलं, त्याचं नाव नवल टाटा.

रतन जी दादा टाटा यांचं शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल एंड जॉन कॉनन स्कूल आणि एलफिंस्टन कॉलेजमध्ये झालं. त्यांनी मद्रास येथे कृषीचा कोर्स केला. ते ईस्ट आशियामध्ये आपल्या कुटुंबाच्या बिजनेसमध्ये सहभागी झाले.

रतन टाटांचे वडिल नवल टाटा

रतन जी दादा टाटा यांनी दत्तक घेतलेल्या मुलाच नाव नवल टाटा. नवल टाटा यांच्या पहिल्या पत्नीच नाव होतं सुनी. त्यांना दोन मुलं झाली. रतन टाटा आणि जिम्मी. रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्याचप्रमाणे जिम्मी यांनी सुद्धा लग्न केलं नाही. नवल टाटा आणि सूनी यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी सिमोन नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. तिच्यापासून एक मुलगा झाला. त्याचं नाव नोएल टाटा. रतन टाटा आणि नोएल टाटा हे सावत्र भाऊ.

टाटांनी किर्लोस्कर कुटुंबाशी जोडलं नातं

नोएल टाटा यांनी Aloo Mistry बरोबर लग्न केलं. दोघांना तीन मुलं आहेत. नेवाइल, लियाह आणि माया टाटा. नेवाइलच लग्न किर्लोसकर ग्रुपच्या Manasi Kirloskar सोबत झालं. लियाह टाटाच स्पेनमध्ये शिक्षण झालय. त्याने तिथून मास्टर्सची डिग्री घेतली.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.