AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rivaba Jadeja Networth: रवींद्र जडेजाच्या पत्नीकडे किती संपत्ती? 15 किलो चांदी पण एकही गाडी नाही

रिवाबा जडेजाने 2022 मध्ये जामनगर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांना भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे. रिवाबा या टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी आहेत.

Rivaba Jadeja Networth: रवींद्र जडेजाच्या पत्नीकडे किती संपत्ती? 15 किलो चांदी पण एकही गाडी नाही
Ravindra Jadeja and his wifeImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 12:23 PM
Share

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने गुजरातच्या भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळ 2.0 मध्ये समावेश झाला आहे. म्हणजेच त्या आता गुजरात सरकारमध्ये मंत्री झाल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे क्रिकेटच्या मैदानात रवींद्र जडेजा उत्कृष्ट कामगिरी करत असताना दुसरीकडे त्याची पत्नी रिवाबा राजकारणात सातत्याने आपला ठसा उमटवत आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत रिवाबा यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली होती.

34 वर्षीय रिवाबा जडेजा यांच्याकडे जवळपास 100 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. 2022 मध्ये त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला होता. 1990 मध्ये गुजरातमधल्या राजकोट इथं जन्मलेल्या रिवाबा यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलं. त्यानंतर जामनगर उत्तरमधून त्या निवडून आल्या. Myneta.com या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या रिवाबा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे 97.35 कोटी रुपये इतकी आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही.

रिवाबा जडेजा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी घोषित केलेल्या संपत्तीपैकी बहुतांश संपत्ती ही पती आणि क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. या संपत्तीचा आकडा 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. तर रिवाबा यांच्याकडे 4 लाख रोख रक्कम आणि दोन बँक खात्यांमध्ये 11 हजार रुपयांच्या ठेवी असल्याचं प्रतिज्ञापत्रात जाहीर करण्यात आलं होतं. तर रवींद्र जडेजाच्या बँक खात्यात 13 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी होत्या. जडेजा कुटुंबातील आणखी एका सदस्याच्या बँक खात्यात 26 कोटी रुपये होते.

रविबाच्या कुटुंबाकडे इतकी संपत्ती असतानाही त्यांनी प्रतिज्ञपत्रात स्पष्ट केलं की त्यांच्याकडे कोणतीही गाडी किंवा विमा पॉलिसी नाही. शिवाय शेअर बाजारातही त्यांनी कोणती गुंतवणूक केली नाही. दागिन्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्यांच्याकडे 5.6 दशलक्ष किमतीचं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने, तसंच 15 किलोग्रॅम चांदी होती. रवींद्र जडेजाकडे ऑडी, फोर्ड एंडेव्हर आणि पोलो जीटीसारखी वाहनं होती.

रिवाबा यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलात असंही म्हटलंय की त्यांच्याकडे शेतजमीन किंवा व्यावसायिक इमारत नाही. माझ्या नावावर स्वत:चं घरही नाही, असंही त्यात स्पष्ट केलंय. तर रिवाबाचे पती रवींद्र जडेजाकडे 33 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची नोंद होती.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.