AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेक ट्रंकेशन प्रणाली काय आहे? सप्टेंबपर्यंत 18 हजार बँकांमध्ये CTS लागू ? सामान्य माणसावर काय परिणाम होणार?

देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत त्या बँकांना सीटीएसमध्ये आणलं जाणार आहे. RBI cheque truncation system

चेक ट्रंकेशन प्रणाली काय आहे? सप्टेंबपर्यंत 18 हजार बँकांमध्ये CTS लागू ? सामान्य माणसावर काय परिणाम होणार?
चेक क्लिअरींग
| Updated on: Feb 08, 2021 | 7:15 PM
Share

नवी दिल्ली: चेकचा वापर करुन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) चेक क्लिअरिंग संदर्भात मोठं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबरपासून बँकांच्या सर्व शाखांमध्ये सीटीएस (Cheque Truncation System) सिस्टीम सुरु होणार आहे. देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत त्या बँकांना सीटीएसमध्ये आणलं जाणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्येचं सीटीएस पद्धती चेक वटवण्यासाठी वापरली जाते. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर वित्तीय धोरण सादर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. (RBI announced that all banks to have cheque truncation system by September 2021 which reduced cheque clearing time)

CTS प्रणाली 2010 पासून सुरु

आरबीआयनं भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरु केली होती. सध्या काही शहरांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे. सप्टेंबर 2021 पासून देशातील बँकांच्या सर्व शांखांमध्ये ही सुविधा सुरु होईल. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. ही प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. याअंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक वटवला जाणार आहे. सध्या 1.50 लाख शाखांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे.

CTS चे फायदे

चेकनं व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावं लागत असे. मात्र, सीटीएस पद्धत सुरु झाल्यानंतर चेक वटवणं सोपं झालं आहे. सीटीएस प्रणालीमुळे चेक क्लिअरिंग सोपं आणि जलद झालं आहे. सीटीएस पद्धतीत चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जावं लागत नाही. चेक ऐवजी त्याचं इलेक्ट्रोनिक प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवली जाते. त्या बँकेकडून मंजुरी आल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. यामध्ये चेक फाटणे किंवा खराब होणे, अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाहीत.

डिजीटल व्यवहारांमध्ये चेकचं महत्व

सध्या ऑनलाईन पेमेंटसचा जमाना असला तरी लोक चेकच्या वापरावर विश्वास ठेवतात. अजूनही चेकचा वापर महत्वाचा समजला जातो. हे पाहूनचं आरबीआयनं सीटीएस प्रणाली देशातील बँकांच्या प्रत्येक शाखांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पेटीएम, गुगल पे, फोन पे, एनईएफटी, आरटीजीएस सारख्या प्रणालींचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.

संबंधित बातम्या:

चेक भरण्याची योग्य पद्धत; एक चूक आणि खाते होणार रिकामं

RBI Monetary Policy: आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही, लवकरच नवा नियम लागू

(RBI announced that all banks to have cheque truncation system by September 2021 which reduced cheque clearing time)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.