AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात आरबीआयने घेतले 57.5 टन सोने, भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 35 टन, 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली.

वर्षभरात आरबीआयने घेतले 57.5 टन सोने, भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?
Gold
| Updated on: Apr 26, 2025 | 10:53 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोन्याची जोरदार खरेदी सुरु केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 57.5 टन सोने भारताने घेतले आहे. यामुळे देशाच्या सुवर्ण भंडारात चांगलीच वाढ झाली आहे. देशाचा सुवर्ण भंडार 879.6 टन झाला आहे. आरबीआयकडून मागील सात वर्षांतील सर्वात मोठी सोने खरेदारी झाली आहे.

सोने नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील सोन्यात गुंतवणूक करत असतात. सर्वसामान्य व्यक्तींबरोबर रिझर्व्ह बँकेकडून आपले सुवर्ण भंडार वाढवले जात आहे. आरबीआयने सोन्याची खरेदी जागतिक अस्थिरता आणि डॉलरची परिस्थिती पाहून केली आहे. जगभरातील केंद्रीय बँका अमेरिकन डॉलरची निर्माण झालेली परिस्थिती आणि पश्चिम अर्थव्यवस्थेवरील दबाबामुळे सोने घेत आहेत. भारतसुद्धा त्या दिशेनेच पाऊल टाकत आहे. त्यामुळे आपला सुवर्ण भंडार मजबूत आणि संतुलित केला जात आहे.

कधी किती घेतले सोने?

‘इकोनॉमिक टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 35 टन, 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. 2024-25 मध्ये सोन्याची पुन्हा जोरदार खरेदी आरबीआयने केली. त्याला कारण डॉलरबाबत निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये अनेक चढ-उतार दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळले आहे. आरबीआयने ही रणनीती भारताच्या विदेशी मुद्रा भंडारात विविधता आणण्यासाठी अवलंबली आहे. सन 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत ज्या देशांनी सर्वाधिक सोने घेतले आहे, त्यात भारताचा क्रमांक टॉप पाचमध्ये आहे.

भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत ठेवले आहे. सोने सुरक्षित गुंतवणूक आहे. अडचणीच्या काळात ते कामाला येते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येते. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परदेशी कर्जाचा धोका देखील सोने खरेदीमुळे कमी होईल. याशिवाय जागतिक स्तरावर भारतीय रुपया मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.