RBI चे रेपो दर कपातीचे गिफ्ट, स्वस्त होणार तुमचा कर्जाचा हप्ता, EMI वर इतके रुपये वाचणार, हाती पैसा खुळखुळणार
Loan EMI Cheaper : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 0.50 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करण्यात आली. RBI ने फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 0.50 टक्के कपात केली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर सलग तिसऱ्यांदा कपात करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे. यामुळे गृहकर्जापासून वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील ईएमआय कमी होण्याची दाट शक्यता आहे.
कमी होईल EMI
जर तुम्ही 50 लाखांचे गृहकर्ज घेतले असेल तर तुमच्या या गृहकर्जावरील महिन्याचा EMI 1,476 रुपयांनी कमी होईल. या वर्षाच्या 2025 मधील पहिल्या सहामहीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. EMI वर 1 टक्का म्हणजे 2,974 रुपयांचा दिलासा मिळेल. पण त्यासाठी सर्व बँकांना RBI च्या धोरणाप्रमाणे व्याज दरात कपात करावी लागणार आहे.
यावर्षी या बँकांनी किती स्वस्त केले कर्ज?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वात मोठी सरकारी बँके SBI ने कर्ज दरात 0.25% पर्यंत कपात केली आहे. या 15 एप्रि पासून ही कपात लागू झाली. बँकेचा EBLR (External Benchmark Lending Rate) 8.65 टक्के झाला आहे. आता बँकेचा RLLR (Repo Linked Lending Rate) 8.50% + क्रेडिट रिस्क प्रीमियम इतका झाला आहे (पूर्वीपेक्षा 0.25% कमी).
HDFC बँक
खासगी क्षेत्रातील HDFC बँकेने कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात केली आहे. HDFC ने फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 0.50% ची कपात केली आहे. नोकरदारांसाठी गृहकर्जाचे व्याजदर 8.70% ते 9.55% असे आहेत. तसेच विशेष दर 2 मे 2025 पर्यंत 8.50% ते 9.35% च्या दरम्यान उपलब्ध आहेत.
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB)
या बँकेने रेपो दरामध्ये झालेल्या कपातीच्या अनुषंगाने आपला बेंचमार्क कर्जदर 6.25% वरून 6% पर्यंत कमी केला आहे. बँकेने RLLR 25 बेसिस पॉइंट्सनी कमी करून 9.10% वरून 8.85% पर्यंत खाली आणला आहे.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
देशातील दुसर्या क्रमांकाची सरकारी बँक, PNB ने व्याज दरांमध्ये 0.25% पर्यंत कपात केली आहे. यामुळे बँकेचा RLLR 8.90% वरून 8.65% इतका कमी झाला आहे.
