IPL 2025 : आयपीएल फायनलमध्ये करोडो गमावूनही प्रीती झिंटाने कमावली दसपट रक्कम
मंगळवारी झालेल्या फायनलमध्ये प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का बसला. या फायनलमध्ये विजेत्या आरसीबीच्या संघाला 20 कोटींची रक्कम तर उप-विजेत्या पंजाबच्या संघाला 13 कोटी रुपये मिळाले. मात्र पराभवानंतरही पंजाबची मालक असलेल्या प्रीति झिंटाने बक्कळ कमाई केली आहे. हे नेमकं कसं झालं ? जाणून घेऊया.

Royal Challengers Bengaluru beat Punjab Kings : आयपीएल 2025 सीझनच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पंजाब किंग्ज इलेव्हनला पराभव पत्करावा लागला. फायनल मॅचमध्ये आरसीबीचा 6 धावांनी विजय झाला आणि पंजाबचे विजयाचे स्वप्न भंगले. विजेत्या आरसीबीच्या संघाला 20 कोटींची रक्कम तर उप-विजेत्या पंजाबच्या संघाला 13 कोटी रुपये मिळाले. दरम्यान पंजाबचा पराभव झाला असला तरी संघाची मालक असलेल्या प्रीती झिंटा हिला 35 कोटींच्या दसपट म्हणजे जवळपास 350 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, हे ऐकून तुम्हीही कदाचित हैराण झाला असाल, पण यामागचा नेमका तर्क काय ते जाणून घेऊया.
2008 साली जेव्हा आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाली तेव्हा प्रीती झिंटाने पंजाब किंग्से इलेव्हन संघात 35 कोटी रुपये गुंतवून 23 टक्के हिस्सा विकत घेतला होता. पण आता प्रीती झिंटाचा हिस्सा 10 पटीने वाढून 350 कोटी रुपये इतका झाला आहे.
दसपट वाढला हिस्सा
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2022 मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाची एकूण किंमत925 मिलियन डॉलर होती. त्यानुसार, जर आपण प्रीती झिंटाचा 23 टक्के हिस्सा वगळला तर तिची कमाई 350 कोटी रुपये होते.
बॉलिवूडमध्ये एकाहून एक सर, हिट चित्रपट देणाऱ्या प्रीती झिंटा हिची एकूण संपत्ती सुमारे 533 कोटी रुपये आहे आणि तिचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, ती ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत फी आकारते, तर दुसरीकडे, तिने रिअल इस्टेटमध्येही भरपूर पैसे गुंतवले आहेत.
2016 साली जीन गुडइनफशी लग्न केल्यानंतर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या प्रीती झिंटा हिचा मुंबईतील पाली हिल येथे 17 कोटींचा फ्लॅट आहे. एवढंच नव्हे तर शिमला इथे तिचं कोट्यवधींचं घर आहे. याशिवाय, मर्सिडीज बेंझ ई क्लास वर्थ आणि बीएमडब्ल्यूसह अनेक लक्झरी कारचा ताफा देखील प्रीतीकडे आहे. अमेरिकेतील बेव्हर्ली हिल्समध्ये तिचं एक आलिशना घरं आहे, तिथे प्रीती तिचा पती आणि दोन मुलांसह राहते.
