पेट्रोल 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता!, कारण काय आणि कधी मिळणार दिलासा?

कच्च्या तेलाची किंमत 9 महिन्यातील सर्वाधिक स्तरावर पोहोचली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच क्रूड ऑईलची किंमत 50 डॉलर प्रति बॅरलच्या वर आहे. अशा स्थितीत पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पेट्रोल 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता!, कारण काय आणि कधी मिळणार दिलासा?
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 3:46 PM

मुंबई: पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महागाईही वाढताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर 90.34 रुपये, तर डीझेल 80.51 रुपये प्रति लीटर आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 30 टक्क्यांनी वाढ होऊन 51 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग म्हणजे 92.76 रुपये प्रति लीटरच्या दराने पेट्रोल मिळत आहे. (Consistent rise in petrol-diesel prices, what are the reasons?)

पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत अचानक का वाढ होतेय? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाची किंमत 9 महिन्यातील सर्वाधिक स्तरावर पोहोचली आहे. मार्चनंतर पहिल्यांदाच क्रूड ऑईलची किंमत 50 डॉलर प्रति बॅरलच्या वर आहे. अशा स्थितीत पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर डीझेलच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2010 मधील सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोलची किंमत तेल कंपन्या ठरवतात. त्यानंतर 2017 मध्ये डीझेलची किंमत निश्चित करण्याचा अधिकारही तेल कंपन्यांना देण्यात आला. इतकच नाही तर एप्रिल 2017 मध्ये पेट्रोल आणि डीझेलची किंमत रोज निश्चित केली जाईल, असा निर्णय झाला. या निर्णयामुळे तेलाच्या किमतीत झालेल्या चढउताराचा फायदा सर्वसामान्य नागरिक आणि तेल कंपन्यांनाही होईल असा तर्क लावण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत पेट्रोल-डीझेलच्या किमती वाढल्या. पण कमी होताना काही दिसून येत नाहीत.

दिलासा कधी मिळणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता नाही. पण पुढील काही दिवसांत 2 ते 4 डॉलर प्रति बॅरलपर्यंत तेलाच्या किमती कमी होण्याच अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. पण सरकारने करात सवलत दिली तर पेट्रोल आणि डीझेलच्या किमती थोड्या कमी होऊ शकतील.

तेलाच्या किमती अचानक का वाढत आहेत?

अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना व्हॅक्सिनच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काही देशांनी लसीला मंजुरी दिलीय. तर काही देश लस निर्मिती कंपन्यांच्या प्रस्तावावर विचार करत आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात कोरोना महामारीवर मात केली जाऊ शकते असा अंदाज आहे. त्यानंतर जगभरात तेलाच्या मागणीत मोठी वाढ होईल. त्यामुळेच तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. त्यासह एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात अमेरितील कच्च्या तेलाच्या उत्पादनात 31 लाख बॅरलने घट झाली आहे. त्याचाही परिणाम पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीवर पाहायला मिळतोय.

भारतातही तेलाची मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डीझेलची मागणी कोरोनापूर्वीच्या स्तरावर पोहोचली आहे. त्याचबरोबर एप्रिलमध्ये डीझेल आणि जेट इंधनाची मागणीही वाढली आहे. ही दरवाढ पेट्रोल-डीझेल पुरतीच मर्यादित नाही तर सरकारला गॅसच्या किमतीमध्येही वाढ करावी लागली आहे.

संबंधित बातम्या:

तुम्हीही सुरू करू शकता स्वत:चे पेट्रोल पंप; जाणून घ्या प्रक्रिया आणि खर्च

घरगुती सिलेंडरवर किती लाखांचा विमा मिळतो; कधी मिळते रक्कम?

Consistent rise in petrol-diesel prices, what are the reasons?

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.