Rupees Downfall News: रुपया कोमात, डॉलर जोमात! महागाईला लागेल कसा लगाम?

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Jul 12, 2022 | 12:05 PM

Rupees Vs Dollar News : गेल्या वेळापेक्षा भारतीय रुपयामध्ये 13 पैशांची घसरण होऊन तो डॉलरच्या तुलनेत 79.58 निच्चांकी स्तरावर घसरला. त्याचा परिणाम महागाईवर होऊ शकतो.

Rupees Downfall News: रुपया कोमात, डॉलर जोमात! महागाईला लागेल कसा लगाम?
सामना अग्रलेखातून टीका
Image Credit source: सोशल मीडिया

Rupees Against Doller News : परदेशात मजबूत अमेरिकन चलन आणि घरगुती शेअर बाजारातली घसरणीमुळे गुंतवणूकदार प्रभावीत झाला आहे. त्याचा थेट परिणाम रुपयावर दिसून आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अंगिकाकरलेल्या कडक धोरणांमुळे रुपया मजबूत होत आहे आणि गुंतवणूकदार ही डॉलर इंडेक्सकडे (Dollar Index) वळला आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. सोन्याच्या दरात ही कपात झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत भारतीय रुपया (Indian Rupees) 13 पैशांनी घसरला, तो सध्या 79.58 वर आला आहे. एवढेच नाही तर त्याचा परिणाम युरो चलनावर ही झाला. डिसेंबर 2002 च्या तुलनेत ही युरोची सर्वात मोठी घसरण घसरण आहे. तर दुसरीकडे डॉलर निर्देशांक ऑक्टोबर 2002 नंतर सर्वात उच्चांकी स्तरावर पोहचला आहे. याचा परिणाम थेट तुमच्या खिश्यावर होईल. इंधनाचा(Fuel Price) भडका उडेल. खाद्यतेल(Edible Oil) वाढेल. सोन्याच्या (Gold) किंमती भडकतील. म्हणजे जेवढ्या काही वस्तू आपण आयात करतो त्याच्या किंमती भडकतील आणि पर्यायाने महागाई वाढेल. त्यामुळे रुपयाची ही घसरगुंडी थांबली नाही तर महागाई आपल्या मुळावर येऊन बसेल एवढं मात्र नक्की. रुपया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरंगळत आहे. रुपयावर अमेरिकन डॉलरचा (Dollar)दबाव कायम असल्याने मंगळवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.58 निच्चांकी स्तरावर घसरला, गेल्या मंगळवारी रुपया 79.38 इतका घसरला होता.

Market Update News :

गेल्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलने 79.45 या सर्वात निच्चांकी स्तरावर घसरला होता. तर इक्विटी बाजारात 30 शेअरच्या निर्देशांकात 259.08 अंकाची घसरण झाली. तर एनएसई निफ्टीत 83.25 अंकांनी घसरला. तर डॉलर इंडेक्स 0.27 टक्क्यांनी वाढला आणि तो 108.31 वर जाऊन पोहचला. तर जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रुड वायदा बाजारात तेलाच्या किंमतीत 1.48 टक्क्यांची घसरण झाली आणि कच्चे तेल 105.52 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी अखंडपणे विक्रीसत्र कायम ठेवले आहे,एप्रिल महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 12,039.43 कोटी, 6,015.34 कोटी रुपये मे महिन्यात तर 25.89 कोटी रुपये जून महिन्यात काढून घेतले आहे. त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 170.51 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

कर्ज परतफेडीचा दबाव

भारताच्या व्यापारात तूट आली आहे.भारताने जूनमध्ये 25.6 अब्ज डॉलरची विक्रमी व्यापार तूट नोंदवली आहे. कोरोनानंतर आता कुठं भारतीय अर्थव्यवस्था सावरायला लागली आहे. त्यातच या वर्षी आणि पुढील वर्षभरात विक्रमी बाह्य कर्ज परतफेड करायची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशावर असलेले जागतिक 40% पेक्षा जास्त कर्ज ( $621 अब्ज) पुढील नऊ महिन्यांत परतफेड करायचं आहे. ही परतफेड भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याच्या 44% च्या समतुल्य आहे. ही परतफेड करताना भारतीय रुपयावर दबाव येईल आणि रुपया पुन्हा कमकूवत होईल.

हे सुद्धा वाचा

या क्षेत्रावरही होणार परिणाम

ज्या ठिकाणी डॉलर चलनाशी (Dollar News) थेट संबंध येतो. त्या प्रत्येक क्षेत्रावर या घडामोडीचा दुरगामी परिणाम दिसून येईल. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक पार्ट्स हे परदेशातून आयात होतो. तर लॅपटॉप, टीव्ही आणि इतर होम अपलायन्ससाठी ही काही पार्ट्स परदेशातून आयात करण्यात येतात. मोबाईलचे काही पार्टस् ही बाहेरुन येतात. हा व्यवहार डॉलरशी संबंधित असल्याने त्यांच्या किंमती वाढणार आहे. परदेशातील शिक्षण ही यामुळे वाढेल. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अधिक रक्कम उभी करावी लागणार आहे. ज्वैलरी आणि डायमंड उद्योगावरही याचा परिणाम पहायला मिळू शकतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI