AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्वाची बातमी! ‘या’ बँकेचे ग्राहक उद्या UPI सेवा वापरू शकणार नाहीत

स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडियाद्वारे आपल्या ग्राहकांना महत्वाची माहिती दिली आहे. SBI चे ग्राहक युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा 6 ऑगस्ट 2025 रोजी काही काळासाठी वापरू शकणार नाहीत.

महत्वाची बातमी! 'या' बँकेचे ग्राहक उद्या UPI सेवा वापरू शकणार नाहीत
upi-npci
| Updated on: Aug 05, 2025 | 6:24 PM
Share

भारतातील करोडो लोक दररोज युपीआयने व्यव्हार करतात. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडियाद्वारे आपल्या ग्राहकांना महत्वाची माहिती दिली आहे. SBI चे ग्राहक युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा 6 ऑगस्ट 2025 रोजी काही काळासाठी वापरू शकणार नाहीत. ही डिजिटल व्यवहार प्रणाली अधिक चांगली आणि सुरक्षित करण्यासाठी बँकेने मेंटेनन्ससाठी हा निर्णय घेतला आहे.

SBI ने याबाबत X वर एक पोस्ट केली आहे. या अधिकृत निवेदनानुसार, 6 ऑगस्ट रोजी पहाटे 1:00 ते पहाटे 1:20 पर्यंत UPI सेवा फक्त 20 मिनिटांसाठी बंद राहणार आहे. या काळात, ग्राहकांना UPI सेवा वापरता येणार नाही, परंतु बँकेने पर्याय म्हणून UPI Lite सेवा वापरण्याचा सल्ला दिला आहे.

UPI Lite काय आहे?

UPI Lite ही सेवा लहान आणि जलद व्यवहारांसाठी वापरली जाते. या सुविधेत बँकेचा सक्रिय सहभाग नसतो. ज्यामुळे बँकेने सर्व्हर बंद असले तरी व्यवहार अयशस्वी होत नाही. तुम्ही लहान खर्चासाठी याचा वापर सहजपणे करू शकता. ही सेवा वॉलेटप्रमाणे आहे. ही सेवा मुख्य UPI नेटवर्कवर अवलंबून नसते, त्यामुळे मुख्य सेवा बंद असतानाही UPI Lite द्वारे व्यवहार करता येतात.

UPI Lite या सेवेद्वारे एका वेळी 1 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येतो. UPI Lite वॉलेटची एकूण मर्यादा 5 हजार आहे. याचा अर्थ म्हणजे तुम्ही या वॉलेटमध्ये 5 पर्यंत ठेवू शकता आणि प्रत्येक व्यव्हारासाठी त्यातून जास्तीत जास्त 1 हजार रुपये वापरू शकता.

UPI Lite कसे वापरायचे?

तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि तुम्हाला UPI Lite वापरायचे असेल तर Google Pay, PhonePe किंवा Paytm सारखे कोणतेही UPI अॅप उघडा आणि आणि UPI Lite हा पर्याय निवडा. यात आवश्यक असणारी माहिती भरा. 500 किंवा 1000 रुपये वॉलेटमध्ये टाका. तुमचे UPI Lite सक्रिय होईल. याद्वारे तुम्ही पेमेंट करु शकता. वॉलेटमधील पैसेस संपल्यानंतर तुम्ही पुन्हा त्यात पैसे टाकू शकता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.