तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का? तर मग पटकन करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील पैसे

त्यामुळे SBI ग्राहक आता बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात. (SBI Bank customers nominee register)

तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का? तर मग पटकन करा 'हे' काम, अन्यथा अडकतील पैसे
SBI बँकेची डिजिटल सेवा बंद राहणार
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 2:04 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया लोकांना अनेक प्रकारचे खाती उघडण्याचा पर्याय दिला आहे. एसबीआय (SBI) मध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट (FD) रेकरिंग डिपॉझिट (RD) करंट अकाऊंट (Current Account), सेविंग अकाउंट (Savings Account) उघडू शकता. मात्र यातील कोणतेही अकाऊंट सुरु केल्यानंतर त्यात nominee रजिस्टर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही nominee रजिस्टर केला नसेल तर तुम्ही घरबसल्या हे काम करु शकता. (SBI Bank customers can register their nominee online)

तुम्ही कोणत्याही बँकेत अकाऊंट उघडले असाल, तर त्यात नॉमिनी रजिस्टर असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर नॉमिनीला बँकेत जमा असलेली रक्कम मिळते. जर तुम्ही नॉमिनीच्या नावाची नोंद केली नसेल तर तुम्हाला अकाऊंटमध्ये पैसे जमा करताना अडथळे येतात. हीच अडचण टाळण्यासाठी नॉमिनीचे रजिस्टर करणे गरजेचे आहे.

नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी पर्याय

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे SBI ग्राहक आता बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात. SBI ने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

घरबसल्या करा Nominee रजिस्ट्रेशन

SBI ने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे एक खुशखबर आहे. आता एसबीआय ग्राहक आमच्या शाखेत भेट देऊन किंवा http://onlinesbi.com वर लॉग इन करून नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात. ही सेवा सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट, फिक्स्ड डिपॉजिट, रेकरिंग डिपॉजिट या सर्वांवर उपलब्ध असेल. यामध्ये तुम्ही घरबसल्या नॉमिनीची नोंदणी करु शकता.

नॉमिनी कोण असतात?

Nominee म्हणून तुम्ही आई-वडिल, पती-पत्नीसह आपल्या मुलाचेही नाव नोंदवू शकता. तसेच तुम्ही एका खात्यात एकापेक्षा जास्त लोकांना नॉमिनी म्हणून ठेवू शकता. तसेच जर जॉईंट अकाऊंट असेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर प्रथमच नॉमिनीला योग्य हक्क मिळतो. तसेच तुम्हाला नॉमिन असलेल्या व्यक्तीचे नाव बदलू शकता. नॉमिनी म्हणून नाव बदलण्याचा, जोडण्याचा किंवा काढण्याचा पूर्ण अधिकार खातेदाराला असतो. (SBI Bank customers can register their nominee online)

संबंधित बातम्या :

पोस्टाची भन्नाट योजना, 10 हजारांची गुंतवणूक करुन 16 लाखांपेक्षा जास्त नफा मिळवा

तुम्हीही वर्क फ्रॉम होम करताय? मग अशी करा दीड लाखांपर्यंत बचत

एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, केवळ 9 रुपयांत मिळवा सिलिंडर, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.