Banking Service : व्हॉट्सॲप वर पूर्ण होतील बँकेची अनेक कामे, SBI ने सुरू केली ही बँकिंग सुविधा !

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या व्हॉट्सॲप वर एसबीय बँकेने काही बँकिंग सुविधा सुरू केल्या आहेत. त्यामुळे बँकेसंदर्भातील काही कामे सहज पूर्ण होऊ शकतील.

Banking Service : व्हॉट्सॲप वर पूर्ण होतील बँकेची अनेक कामे, SBI ने सुरू केली ही बँकिंग सुविधा !
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 10:41 AM

आजच्या टेक्नोसॅव्ही काळात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करते. व्हॉट्सॲप (WhatsApp) हे तर सर्वात लोकप्रिय ॲप आहे. जगभरातील कोट्यावधी युजर्स या ॲपचा वापर करतात. व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे, व्हिडीओ कॉल करणे, चॅटिंग तसेच व्हॉइस नोट्स पाठवणे, अशा सर्व गोष्टी करू शकता. पण आता याच व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही बँकेशी निगडीत काही कामेही करू शकाल. भारतीय स्टेट बँकेने ( SBI) ग्राहकांसाठी व्हॉट्सॲपवर बँकिंग सेवा (Banking Service) सुरू केल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकेचे काही काम असेल तर दरवेळेस बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. जाणून घेऊया एसबीआयने ग्राहकांसाठी कोणत्या सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

SBI च्या व्हॉट्सॲपवरील सर्व्हिसद्वारे मिळणार बँकिंग सुविधा –

– व्हॉट्सॲप बँकिंग सेवेद्वारे एसबीआयचे ग्राहक त्यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम आहे, म्हणजेच अकाऊंट बॅलन्स किती आहे, हे जाणून घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

– तसेच मिनी स्टेटमेंटही मिळेल, ज्यामध्ये मागील 5 ट्रॅन्झॅक्शनची माहिती मिळू शकेल.

बँकेचे खातेधारक एटीएम किंवा बँकेमध्ये न जाताच व्हॉट्सॲपवर मिनी स्टेटमेंटद्वारे माहिती मिळवू शकतात, असे एसबीआयने नमूद केले आहे. त्यासाठी तुमचे एसबीआय बँकेत खाते असणे आवश्यक आहे, त्यानंतर तुम्ही एसबीआय व्हॉट्सॲप बँकिंग सर्व्हिसचा वापर करू शकता. व्हॉट्सॲप सर्व्हिसचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एसबीआय अकाऊंट रजिस्टर करावे लागेल व एका SMS द्वारे परवानगी द्यावी लागेल.

अशी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया –

1)एसबीआय व्हॉट्सॲप बँकिग सर्व्हिससाठी रजिस्टर करण्यासाठी (SMS WAREG A/C No) असे लिहून तुमच्यया रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 917208933148 या नंबरवर SMS पाठवावा लागेल. त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एसबीआय व्हॉट्सॲप सर्व्हिसचा वापर सहजपणे करू शकाल.

2) त्यानंतर तुम्हाला (+909022690226) या व्हॉट्सॲप नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर एक पॉप-अप मेसेज उघडेल.

3) नंतर तुम्हाला व्हॉट्सॲपवर अकाऊंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, डी रजिस्टर व्हॉट्सॲप बँकिंग सर्व्हिस असे पर्याय देण्यात येतील. त्यापैकी जो पर्याय तुम्ही निवडाल त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळेल.

4) त्याशिवाय जर तुम्हाला अकाऊंट बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्हाला 1 नंबर टाइप करावा लागेल. मिनी स्टेटमेंटबद्दल माहिती हवी असल्यास तु. म्हाला व्हॉट्सॲपवर 2 नंबर टाइप करावा लागेल.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.