5

या बँकांमध्ये RD वर मिळतंय इतके व्याज, पाहा संपूर्ण यादी

बॅंकांच्या आरडीमध्ये तुम्ही महिन्याच्या ठराविक तारखेला रक्कम जमा करुन गुंतवणूक करु शकता. या बचतीवर मुदतपूर्तीनंतर व्याजासह मुद्दल परत मिळते.

या  बँकांमध्ये RD वर मिळतंय इतके व्याज, पाहा संपूर्ण यादी
note 500Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 3:57 PM

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : बॅंकामध्ये आरडी ( RD )  म्हणजे रिकरिंग डीपॉझिटला गुंतवणूकीसाठी सुरक्षित गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय मानले जाते. या गुंतवणूकीच्या मदतीने गुंतवणूकदार मोठ्या काळात एक चांगला निधी मिळवू शकतो. या योजनेत दर महिन्यांच्या विशेष तारखेला ठराविक रक्कम हप्ता स्वरुपात भरावे लागते. तुमच्या जमलेल्या रकमेवर बॅंक व्याज देत असते. आरडी योजनेतील व्याज सेव्हींग अकाऊंट्स पेक्षा जास्त आणि फिक्स्ड डीपॉझिट्स पेक्षा कमी असते. चला पाहूयात कोणत्या बॅंकांमधील आरडीवर किती व्याज मिळते…

आरडी म्हणजे रिकरिंग डिपोझिट होय. यामध्ये दरमहा एका ठराविक तारखेला तुम्ही ठराविक रक्कम बचत करु शकता. पोस्टात आणि बँकांमध्ये तुम्ही रिकरिंग डिपोझिट करु शकता. रिकरिंग डिपोझिटच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या बचतीवर मुदतपूर्तीनंतर व्याजासह मुद्दल परत मिळते. रिकरिंग डिपोझिटच्या मदतीने दरमहा थोडी थोडी बचत करून मोठी रक्कम उभारणे सहज शक्य होत असल्याने ही योजना लोकप्रिय आहे.

इंडसइंड बॅंक ( IndusInd Bank )

इंडसइंड बॅंकच्यावतीने 12 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंच्या आरडीवर 7 ते 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. 12,15,18,21 आणि 24 महिन्यांच्या आरडीवर कमाल 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.

आयसीआयसीआय बॅंक ( ICICI Bank )

आयसीआयसीआय बॅंक देखील सहा महिन्यांपासून ते 10 वर्षांच्या आरडीची ऑफर दिली जात आहे. याच गुंतवणूकीसाठी 4.75 टक्के पासून 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. सर्वात अधिक व्याज 15,18,21 आणि 24 महिन्यांच्या आरडीवर दिले जात आहे.

एचडीएफसी बॅंक ( HDFC )

एचडीएफसी बॅंकच्यावतीने गुंतवणूदारांना सहा महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या आरडी ऑफर केली जात आहे. यात गुंतवणूकदारांना 4.50 टक्क्यांपासून ते 7.10 टक्के व्याज दिले जाते आहे. सर्वात जास्त 7.10 टक्के व्याज 15 महिन्यांचा कालावधी असलेल्या आरडीला दिले जात आहे.

एसबीआय ( SBI )

एसबीआय बॅंक आपल्या ग्राहकांना एक ते 10 वर्षांच्या RD ऑफर केली जात आहे. यावर बॅंक 6.50 ते 7 टक्के इतके व्याज देत आहे. सर्वात जास्त व्याज दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी वर्षांच्या आरडीला दिले जात आहे.

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?