सेबीकडून सिल्व्हर ‘ईटीएफ’साठीच्या नियमात बदल, जाणून घ्या काय परिणाम होणार?

Silver ETF | चांदी केवळ मौल्यवान धातूच नाही तर त्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत. हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये देखील चांदी वापरली जाते. त्यामुळे आगामी काळात गुंतवणुकीचा हा पर्याय फायदेशीर ठरु शकतो.

सेबीकडून सिल्व्हर 'ईटीएफ'साठीच्या नियमात बदल, जाणून घ्या काय परिणाम होणार?
चांदी

नवी दिल्ली: सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडून सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड (सिल्व्हर ईटीएफ) साठीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. सध्या, फक्त भारतीय म्युच्युअल फंडांना गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफ लॉन्च करण्याची परवानगी आहे. सेबीने सिल्व्हर ईटीएफबाबत नियम बदलले आहेत.

सिल्व्हर ईटीएफ ही अशी म्युच्युअल फंड योजना आहे की, ज्यामध्ये गुंतवणूक प्रामुख्याने चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये केली जाते. SEBI ने म्हटले आहे की जर म्युच्युअल फंड योजना कोणत्याही एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये गुंतवणूक करत असेल तर ती अंडरलाइंग गुडस् म्हणजेच फिजिकल सेटलमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवू शकते.

सिल्व्हर ईटीएफ स्कीममध्ये, प्रत्यक्ष चांदी किंवा चांदीशी संबंधित साधन सेबीच्या नोंदणीकृत कस्टोडियनकडे जमा करावे लागते. सिल्व्हर ईटीएफ योजनेत गुंतवणूक करताना काही अटी असतात. जर एखाद्याने चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक केली, तर तो निधी फक्त चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये वापरला जाईल. म्युच्युअल फंड कंपनी हा निधी बँकेत जमा करून अल्पावधीत वापरू शकते.

सिल्व्हर ईटीएफचा काय फायदा?

सिल्व्हर ईटीएफचा सरळ अर्थ असा आहे की जसे लोक स्टॉकची खरेदी आणि विक्री करतात, त्याचप्रमाणे चांदीचे ईटीएफ देखील खरेदी आणि विक्री केले जाऊ शकतात. यामुळे चांदीमध्ये कमाईची शक्यता वाढेल. शेअर्स किंवा स्टॉक्समध्येही असेच घडते की ज्या गुंतवणूकदाराला फायदेशीर व्यवहार दिसतो, तो तो विकून नफा कमावतो. सिल्व्हर ईटीएफचेही असेच होईल.

जर तुम्ही चांदीच्या वस्तू घरात ठेवली तर तुम्हाला सोनार किंवा दागिन्यांच्या दुकानात जाऊन ते विकावे लागेल. सोनार बाजारपेठेतील चालू दर बघून व्यवहार करेल. मग विक्री केल्यानंतर, तुमच्या हातात पैसे मिळतील. चांदीच्या ईटीएफमध्ये, झटपट विक्री आणि झटपट पैसे खिशात येऊ शकतात.

सिल्व्हर ईटीएफ कशाप्रकारे काम करणार?

विकसित बाजारात, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या एक्सचेंज ट्रेडेड फंड लाँच करतात जे चांदीच्या किमती दोन प्रकारे ट्रॅक करतात. काही योजना डेरिव्हेटिव्ह्ज (फ्युचर्समध्ये गुंतवणूक) वापरून चांदीच्या परताव्याची नक्कल करतात. तर काहीजण त्यासाठी चांदीचे बार खरेदी करणे पसंत करतात. या दोन्ही पर्यायांमध्ये अल्प किंवा दीर्घ मुदतीत दुप्पट परतावा मिळतो.

चांदी केवळ मौल्यवान धातूच नाही तर त्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत. हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये देखील चांदी वापरली जाते. त्यामुळे आगामी काळात गुंतवणुकीचा हा पर्याय फायदेशीर ठरु शकतो.

संबंधित बातम्या:

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 303 कोटींची गुंतवणूक

जपानमध्ये महागाईचा उच्चांक, तिसरी मोठी अर्थव्यवस्था संकटात, भारतात जपानी वस्तू महागणार?

प्रवासादरम्यान तिकीट हरवले? चिंता करू नका; ‘असे’ मिळवा डुप्लीकेट तिकीट


Published On - 6:29 am, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI