Share Market : सोमवारी शेअर बाजाराची काय असेल चाल..गुंतवणूकदारांची पुन्हा फिरकी की करणार मालामाल..

Share Market : शेअर बाजाराची दिशा काय राहील, तुम्हाला फायदा होईल?

Share Market : सोमवारी शेअर बाजाराची काय असेल चाल..गुंतवणूकदारांची पुन्हा फिरकी की करणार मालामाल..
शेअर बाजाराची दिशा काय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 4:36 PM

नवी दिल्ली : गटांगळ्या खाणाऱ्या शेअर बाजाराने (Share Market) मध्यंतरी जोरदार मुसंडी मारली. पण गेल्या मध्य आठवड्यात आणि शुक्रवारी बाजाराने जो काही रिव्हअर्स गेअर टाकला की भल्याभल्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर आता सोमवारी, 5 डिसेंबर 2022 रोजी बाजाराची चाल काय असेल याविषयीचा अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. गुजरात विधानसभेचे (Gujrat Legislative Assembly Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान, आरबीआयचे (RBI) पतधोरण यासर्व बाबींचा परिणाम बाजारावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे बाजार तेजीचा सूर आळवणार की गिरकी घेणार याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

गुजरातसह हिमाचल प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपा पुनरागमन करेल का याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तर पतधोरण बैठकीत रेपो दरात एकदम वाढीची शक्यता नाही. रेपो दरात थोडीफार वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येईल.

जागतिक परिणांमामुळे शेअर बाजारात चढउतार होत राहील. केंद्रीय बँकेची पतधोरण समिती (MPC) बैठक होत आहे. तर गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे परिणाम 8 डिसेंबर रोजी हाती येतील. त्याचा परिणाम बाजारावर हमखास दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव सातत्याने घसरत आहे. रशियाने युरोपीय संघातील देशांसाठी ऑयल मार्केट कॅप ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. पण निवडणुकांच्या निकालानंतर इंधन दर घसरल्यास त्याचा परिणाम बाजारावर दिसू शकतो.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सातत्याने व्याजदरात वाढ केली होती. पण अमेरिकेत महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने व्याज दर घटले आहे. दुसरीकडे डॉलरचा तोरा ही कमी झाल्याने रुपया वधारला आहे. याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

चीनमध्ये कोविड नियंत्रणावरुन लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. काही ठिकाणी निर्बंधता थोडीफार सूट देण्यात आली असली तरी कोविड नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी चीनमध्ये निर्बंध एकदम सैल करण्यात येणार नसल्याच्या बातम्या येत आहे. बाजार त्यावर काय प्रतिक्रिया देतो, हे समोर येईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.