नवी दिल्ली : या आठवड्यात शेअर बाजारावर (Share Market) अनेक घडामोडींचा प्रभाव असेल. यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) बँकेच्या पतधोरणाचा परिणाम दिसून येईल. महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेतील केंद्रीय बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. तर भारतात औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ महागाई दर सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. तर घाऊक महागाईचे आकडे येत्या बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर बाजाराची दिशा ठरणार आहे.