Share Market: 1 लाख गुंतवणारे आज 81 लाखांचे मालक! या शेअरचा बाजारात धुमाकूळ
Multibagger small-cap stock: मल्टिबॅगर स्टॉकने अनेक गुंतवणूकदारांचे नशीब पालटवले. ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ही रक्कम कायम ठेवली. त्यांना मोठा फायदा झाला. आज ते 81 लाख रुपयांचे धनी, मालक झाले. कोणता आहे हा स्टॉक?

Multibagger small-cap stock: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची नेहमी मल्टिबॅगर स्टॉकसाठी शोधाशोध सुरू असते. कारण हा स्टॉक अगदी काही वर्षांत त्यांना लॉटरी लावतो. त्यांची छोटीशी गुंतवणूक कित्येक पटीने वाढते. त्यांना धनकुबेर करते. ऑटो कंपनी फोर्स मोटर्सचा(Force Motors) शेअर असाच अनेकांसाठी भाग्यशाली ठरला आहे. कारण या एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. त्यांना मालामाल केले आहे. त्यांची आर्थिक तंगी कमी केली आहे. फोर्स मोटर्सच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांपासून तेजीचे सत्र कायम आहे. या शेअर्समध्ये मोठी उलाढाल सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या पोर्टफोलिओत हा शेअर वेल्थ क्रिएटर्स ठरला आहे. हा शेअर मध्यंतरी दबावात सुद्धा होता. पण तरीही जे चिवट गुंतवणूकदार टिकून राहिले. त्यांना आता त्याचे फळ मिळाले. हा शेअर मल्टिबॅगर ठरला. या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 81 लाख रुपयांचा परतावा दिला.
काय करते ही कंपनी?
फोर्स मोटर्स भारतात व्हॅन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी व्हर्टिकली इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल उत्पादक आहे. या कंपनीकडे ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स, एग्रीगेट्स आणि वाहनांची श्रेणी उपलब्ध आहे. ही कंपनी लाईट कमर्शियल व्हेईकल्स (LCVs), मल्टी-यूटिलिटी व्हेईकल्स (MUVs), स्मॉल कमर्शियल व्हेईकल्स (SCVs), स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल्स (SUVs) आणि टॅक्टर निर्मिती करते.
या शेअरने दिला मोठा परतावा
गेल्या एका वर्षात फोर्स मोटर्सच्या शेअरने 164 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. या दोन वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 340 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांतील चार वर्षांत फोर्स मोटर्सच्या शेअर्सने सकारात्मक परतावा दिला आहे. एकट्या 2025 मध्ये, आतापर्यंत या शेअरने 181 टक्क्यांची मोठी खेळी खेळली आहे. पहिल्यांदा या शेअरने 21,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा शेअर 21,999 रुपये प्रति शेअरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे.
यासह Nifty 500 स्टॉक्समध्ये सर्वात जोरदार कामगिर करणाऱ्या स्टॉक्समध्ये त्याने जागा मिळवली आहे. 2013 मध्ये या शेअरची किंमत 225 रुपये इतकी होती. 2025 मध्ये 8000 टक्क्यांच्या उसळीसह हा शेअर 18289 रुपये प्रति शेअरवर पोहचला, ज्यांनी त्यावेळी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले. त्यांना 444 शेअर मिळाले. आता त्यांचे मूल्य 81.20 लाख रुपयांवर पोहचले आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
