AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्सचं युरोपला डिझेल?; RIL स्टॉक्स 6 टक्क्यांनी वधारला, गुंतवणुकदारांना खिश्यात 80 हजार कोटी

रशिया-यूक्रेन संकटामुळं (Russia Ukraine Crisis) युरोपात तेल तुटवड्याचे ढग जमा झालेले आहेत. त्यामुळे युरोपला डिझेलचा पुरवठा करण्याच्या विचारात रिलायन्स आहे. रशिया-युक्रेन संकटात रिलायन्सने इंधन पुरवठ्याची संधी साधल्याचे चित्र दिसून आलं.

रिलायन्सचं युरोपला डिझेल?; RIL स्टॉक्स 6 टक्क्यांनी वधारला, गुंतवणुकदारांना खिश्यात 80 हजार कोटी
रिलायन्सImage Credit source: TV9
| Updated on: Mar 09, 2022 | 9:35 PM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांनी उसळला. सलग दोन दिवस बाजारात तेजीचं चित्र पाहायला मिळालं. आज (बुधवार) शेअर बाजारातील तेजीला रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries) बूस्टर मिळाला. आज बाजार मूल्य विचारात घेता देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तब्बल 6 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. स्टॉक (Stock) आज सर्वोच्च स्तरावर बंद झाला. शेअर बाजारातील उसळीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या गुंतवणुकदारांना तब्बल 80 हजार कोटींचा फायदा झाला. रशिया-यूक्रेन संकटामुळं (Russia Ukraine Crisis) युरोपात तेल तुटवड्याचे ढग जमा झालेले आहेत. त्यामुळे युरोपला डिझेलचा पुरवठा करण्याच्या विचारात रिलायन्स आहे. रशिया-युक्रेन संकटात रिलायन्सने इंधन पुरवठ्याची संधी साधल्याचे चित्र दिसून आलं.

रिलायन्सला संकटात संधी!

आज (बुधवार) ट्रेडिंगदरन्यान सेन्सेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक 5.24 टक्क्यांच्या वाढीसह 2353.8 च्या स्तरावर बंद झाला. केवळ एकाच दिवसात कंपनीच्या स्टॉकमध्ये 117 रुपयांची वाढ नोंदविली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात स्टॉक 2236.70 च्या टप्प्यावर बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक निफ्टीमध्ये सहभागी 50 स्टॉक मध्ये सर्वाधिक तेजी नोंदविणारा स्टॉक ठरला आहे. आजच्या वाढीसह बीएसई कंपनीचे बाजार मूल्य 15,92,304 कोटींवर पोहोचले आहे. काल (मंगळवारी) कंपनीचे बाजारमूल्य 15,13,087 रुपयांच्या स्तरावर होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणुकदारांचे गुंतवणूक मूल्य 79,217 कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स स्टॉकमध्ये आजच्या तेजीसह स्टॉक आपल्या सर्वोच्च स्तरापेक्षा 14 टक्क्यांनी खाली आहे. तर, यावर्षीच्या नीच्चांकी स्तराच्या तुलनेत स्टॉक 25 टक्क्यांनी वाढला आहे.

सेन्सेक्सचा इलेक्शन मूड!

रशिया-युक्रेन निवळलेल्या वादासह पाच राज्यांच्या विधानसभांच्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारावर उमटले. रिलायन्स इंडस्ट्री सहित प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी नोंदविली गेली. आज (बुधवारी) शेअर बाजार तेजीसह बंद झाला. बुधवारच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 54,647 वर आणि निफ्टी 332 अंकांच्या वाढीसह 16345 वर पोहोचला. शेअर बाजारात मेटल (Metal) सेक्टर वगळता अन्य सेक्टर इंडेक्स मध्ये तेजी नोंदविली गेली. सर्वाधिक वाढ मीडिया आणि रिटेल सेक्टरमध्ये दिसून आली.

इतर बातम्या :

Share Market : Exit Pollचा बूस्टर, तेजीचे सलग 2 दिवस; सेन्सेक्स 1223 अंकांनी वधारला

GOLD RATE UPDATE: 54 हजारांचा टप्पा पार! मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं, जाणून घ्या- ताजे भाव

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.