AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubham Polyspin | छोटा पॅकेट बडा धमाका! 900% पेक्षा जास्त परतावा, आता करा बोनस शेअरची तयारी

Shubham Polyspin Stocks | शुभम पॉलिस्पिन हा गुंतवणूकदारांसाठी जॅकपॉट ठरला आहे. या स्टॉकने आतापर्यंत 900% पेक्षा जास्त परतावा दिला असून लवकरच कंपनी शेअर्स बोनस म्हणून देणार आहे.

Shubham Polyspin | छोटा पॅकेट बडा धमाका! 900% पेक्षा जास्त परतावा, आता करा बोनस शेअरची तयारी
बोनसचे गिफ्ट!Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 24, 2022 | 7:36 AM
Share

Shubham Polyspin Stocks | वस्त्रोद्योगातील एक छोटा स्टॉक (Stock) जायंट किलर (Giant Killer) ठरला आहे. या शेअरने चांगल्या चांगल्या पैलवानांना धोबीपछाड दिला आहे. शुभम पॉलिस्पीन (Shubham Polyspin)ही एक स्मॉल कॅप कंपनी (Small Cap Company) आहे. पण या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. चांगल्या स्टॉकवर मिळाला नाही इतका दमदार परतावा मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 900% टक्क्यांहून अधिक परतावा (Returns) दिला आहे. या कालावधीत शुभम पॉलिस्पिनचे शेअर्स 22 रुपयांवरून 220 रुपयांवर गेले आहेत. कंपनीचे समभाग 21 जुलै 2022 रोजी 226.20 रुपयांच्या 52 आठवड्यांतील नव्या उच्चांकी पातळीवर (High Level) पोहोचले आहेत. शुभम पॉलीस्पिन गुंतवणूकदारांना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी बोनस शेअर्स (Bonus share) देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअरबाबत लवकरच निर्णय होणार आहे. कंपनीच्या बोर्डाची बैठक 13 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या बैठकीत जून 2022 च्या तिमाहीचे निकाल तसेच बोनसचा मुद्यासोबतच शेअर इश्यूची फेरमांडणीवर ही विचार करण्यात येणार आहे. या बैठकीत जून 2022 च्या तिमाहीचे निकाल तसेच बोनसचा मुद्यासोबतच शेअर इश्यूची फेरमांडणीवर ही विचार करण्यात येणार आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची नजर

या स्टॉकवर परदेशी गुंतवणूकदार ही फिदा झाले असून त्यांनी ही कंपनीत गुंतवणूक वाढवली आहे. परदेशी फंडांनी नुकतेच कंपनीचे 1 लाखाहून अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. फॉरेन फंड एजी डायनॅमिक फंडांनी नुकतीच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) लिस्टेड कंपनी शुभम पॉलिस्पिनचे शेअर्स खरेदी केले आहेत. एजी डायनॅमिक फंडांनी हे समभाग खुल्या बाजारातून 215.05 रुपये प्रति शेअर या भावाने खरेदी केले आहेत. बल्क डीलच्या आकडेवारीनुसार, या कराराचा आकार 2.19 कोटी रुपये होतो. कंपनीच्या बोर्डाची बैठक 13 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या बैठकीत जून 2022 च्या तिमाहीचे निकाल तसेच बोनसचा मुद्यासोबतच शेअर इश्यूची फेरमांडणीवर ही विचार करण्यात येणार आहे.

1 लाख झाले 10 लाख

शुभम पॉलिस्पिन लिमिटेडच्या शेअरने जबरदस्त कामगिरी बजावली आहे. मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचे समभाग 30 मे 2019 रोजी 20.83 रुपयांच्या पातळीवर होते. 21 जुलै 2022 रोजी बीएसईवर कंपनीचे समभाग 226.20 रुपयांवर बंद झाले. या कालावधीत शुभम पॉलिस्पिनच्या शेअरने 930 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 30 मे 2019 रोजी शुभम पॉलीस्पिनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.85 लाख रुपये झाले असते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.