AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरी करता करता 20 हजार असे कमवा; कोणीच सांगणार नाही ही स्मार्ट आयडिया

Side Income Ideas : महागाईच्या या काळात घराचं, वाहनांचं स्वप्न, मुलांचं शिक्षण हे पगारावर पूर्ण होत नाही. त्यासाठी अतिरिक्त काम करून अथवा इतर ठिकाणी काम करून कमाई करावी लागते. पण या 5 सॉलिड आयडियामुळे तुम्ही घरबसल्या 20-25 हजारांपर्यंत सहज कमाई करू शकता.

नोकरी करता करता 20 हजार असे कमवा; कोणीच सांगणार नाही ही स्मार्ट आयडिया
अतिरिक्त कमाई
| Updated on: Dec 04, 2025 | 5:11 PM
Share

जर तुम्हाला नोकरी व्यतिरिक्त अजून कमाई करायची असेल. तर दुसरीकडे पार्ट टाईम काम करावे लागेल. पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही. पण या काही आयडियामुळे तुम्ही सहज कमाई करु शकता. त्यासाठी मोठी मेहनत घेण्याची गरज नाही. तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही कमाई करू शकता. त्यासाठी फार मोठा वेळ देण्याची, कष्ट करण्याची गरज नाही. या 5 दमदार व्यवसायातून तुम्ही घरबसल्या 20-25 हजारांपर्यंत सहज कमाई करू शकता. अर्थात त्यासाठी इंटरनेट, स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप यापैकी एक आणि कौशल्य असणं आवश्यक आहे.

कंटेंट रायटिंगसह ग्राफिक डिझाईनिंग

जर तुमच्याकडे कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट वा डिजिटल मार्केटिंग सारखं कौशल्य असेल तर तुम्ही Fiverr, Upwork आणि या सारख्या इतर अनेक प्लॅटफॉर्मवर काम करु शकता. सुरूवातील छोट्या प्रकल्पापासून सुरूवात करून स्कीलच्या जोरावर क्लाईंट्स जोडू शकता. महिन्यात 10-12 तास देऊन तुम्ही आरामशीर 15-25 हजारांपर्यंत कमाई करू शकता.

ट्यूशन, शिकवणी घेऊन कमाई

जर तुम्ही एखाद्या विषयात तरबेज असाल. पारंगत असाल. तो विषय शिकवण्याची हतोटी तुमच्याकडं असेल तर तुम्ही गणित, विज्ञान वा इंग्रजी या सारख्या विषयाची ऑनलाइन ट्यूटरिंग घेऊ शकता. Vedantu, Unacademy सारख्या वा इतर प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून अथवा तुमचे स्वतःचे ऑनलाईन क्लास सुरू करून तुम्ही अधिकची कमाई करू शकता. हे क्लास खास करून आठवड्याच्या शेवटी असतात. त्यातून चांगली कमाई होऊ शकते. तुम्ही ऑफलाईनही शिकवणी घेऊ शकता.

Affiliate Marketing

सध्या अनेक लोक Amazon अथवा Flipkart सारख्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून मोठी कमाई करत आहेत. त्यासाठी केवळ योग्य उत्पादनाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचं आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब, ब्लॉगिंग सारख्या ऑनलाईन उत्पादनाच्या मार्केटिंगद्वारे ही कमाई होते.

ड्रॉपशिपिंग

ड्रॉपशिपिंग या व्यवसायात तुम्हाला उत्पादन खरेदी करण्याचे अथवा त्याचा साठा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ ऑनलाइन ऑर्डर देऊन थर्ड पार्टीकडून डिलिव्हरी करावी लागते. Shopify आणि WooCommerce सारख्या साईटमुळं हे काम सोप झालं आहे.

फिरता उद्योग

जर तुम्ही ऑफलाईन काम करू इच्छित असाल तर आठवडी बाजारात नशीब आजमावता येईल. यामध्ये फ्ली मार्केट्स, मेळा, लोकल फेअर, आनंद मेळा यासारख्या ठिकाणी हाताने तयार केलेल्या वस्तू वा इतर गिफ्ट आयटमची विक्री करू शकता. यातून बाजाराचा अंदाज येईल आणि योग्य उत्पादनाद्वारे तुम्हाला कमाई करता येईल.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.