AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 700 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका

आशियाई शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आता याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी शेअर बाजार सुरू होताच पडझडीला सुरुवात झाली. बीएसई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सुरुवातीच्या सत्रातच तब्बल 700 अकांनी कोसळला.

शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 700 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका
रशिया-युक्रेनमधील संघर्षाचे मुंबई शेअर बाजारावर पडसाद
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 12:00 PM
Share

मुंबई : आशियाई शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आता याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी शेअर बाजार सुरू होताच पडझडीला सुरुवात झाली. बीएसई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सुरुवातीच्या सत्रातच तब्बल 700 अकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये देखील 200 अकांची घसरण झाली. शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

गुरुवारीही घसरण

गुरुवारी देखील शेअरबाजारात घसरण सुरूच होती. गुरुवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 319.82 अकांच्या घसरणीसह 57,581.32 वर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये देखील 91 अकांची अर्थात 0.53  टक्क्यांची घसरण होऊन निफ्टी 17,157.40 अंकांवर बंद झाला. मात्र शुक्रवारी शेअर मार्केट सुरू  होताच सेन्सेक्स आणखी घसरला आहे. सेन्सेक्स तब्बल सातशे अकांनी घसरल्याने याचा मोठा फटका हा गुंतवणुकदारांना बसला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय घडामोंडीचा प्रभाव हा आशियातील शेअर मार्केटवर पडताना दिसून येत आहे. पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये काही अंशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज  वर्तवला जात आहे.

टायटनच्या शेअरला मोठा फटाका

आज सर्वाधिक फटका हा टायटनच्या शेअरला बसल्याचे दिसून आले आहे. टायटनच्या शेअरची किंमत ही जवळपास तीन टक्क्यांनी कमी झाली आहे. टायटनपाठोपाठ एचयूएएल, मारूती, एशियन पेंट्स आणि इंडसलँड बँक यांचे देखील शेअर कोसळले आहेत. दुसरीकडे मात्र इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. शेअर बाजारामध्ये सध्या सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी असा सल्ला शेअर मार्केट तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार

HDFC लाईफची निवृत्ती योजना, पॉलिसीच्या सुरुवातीलाच वार्षिक व्याज करा लॉक, इतरही अनेक फायदे

नव्या वर्षात विमान प्रवास होणार स्वस्त?; जेट एअरवेज 2.0, अकासा प्रवाशांच्या सेवत

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.