AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MARKET TRACKER: आठवडा घसरणीचा, गुंतवणुकदारांचे 14 लाख कोटी पाण्यात; सेन्सेक्स 2 हजार अंकांनी गडगडला

विदेशी गुंतवणुकदारांचा विक्रीचा जोर, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, फेडरल रिझर्व्हच्या कर्जदरात वाढीचे संकेत आणि रशिया-युक्रेन संकटाचा परिणाम देखील घसरणीला कारणीभूत ठरला आहे. चालू आठवड्यात महत्वाचे स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.

MARKET TRACKER: आठवडा घसरणीचा, गुंतवणुकदारांचे 14 लाख कोटी पाण्यात; सेन्सेक्स 2 हजार अंकांनी गडगडला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2022 | 6:05 PM
Share

नवी दिल्ली: शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) गेल्या आठवड्यातील पाचही दिवस घसरणीचे ठरले. प्रमुख निर्देशांक चार टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारातील घसरणीला जागतिक अर्थकारणातील घडामोडी कारणीभूत असल्याचे मानले जातात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, विदेशी गुंतवणुकदारांचा विक्रीचा जोर, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, फेडरल रिझर्व्हच्या कर्जदरात वाढीचे संकेत आणि रशिया-युक्रेन संकटाचा परिणाम देखील घसरणीला कारणीभूत ठरला आहे. चालू आठवड्यात महत्वाचे स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. चालू आठवड्यातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना अंदाजित 14 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. चालू आठवड्यात सर्वच निर्देशांकात घसरण झाली. धातू व उर्जा क्षेत्राला (Metal and Energy Sector) सर्वाधिक घसरणीला सामोर जावं लागलं. दोन्ही क्षेत्रांचे निर्देशांक 13-13 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बीएसई टेलिकॉम निर्देशांक (Telecom Index) 6.7 टक्क्यांनी गडगडला.

..घसरणीचे पाच दिवस

पाच दिवसांच्या घसरणीचा परिणामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात आठवड्याच्या अखरेच्या दिवशी मार्केट कॅप 255.17 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होता. एका आठवड्यात गुंतवणुकदारांना एकूण 13.83 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2042 अंक (3.72%) घसरण नोंदविली गेली. तर निफ्टी 629 अंक (3.83%) टक्क्यांची घसरण झाली. पाच दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 53 हजार आणि निफ्टी 15800 स्तराच्या खाली पोहोचला. चालू मे महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीत 7-7 टक्क्यांची घसरण झाली आहे.

बाजार अस्थिर, गुंतवणुकदारांत चलबिचल-

शेअर बाजारातील घसरणीला एकाधिक कारणे कारणीभूत ठरली आहेत. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे महागाईचा आलेख उंचावण्याची धास्ती गुंतवणुकदारांमध्ये आहे. त्यामुळे जागतिक अर्थपटलावर घसरण नोंदविली गेली. तसेच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढीचं संकेत दिले आहेत. परकीय गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातून पैशाचा ओघ सुरुच ठेवला आहे. आगामी काळात बाजारात अस्थिरतेचं चित्र कायम राहिल्यास गुंतवणुकदारांचा बाजारातून पैशांचा ओघ वाढू शकतो.

गुंतवणुकदारांचे ‘नो रिस्क’:

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूक मूल्य घटण्याची भीती विदेशी गुंतवणुकदारांना आहे. तसेच भारतीय शेअर बाजारात अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. चालू वर्षात आतापर्यंत 1.33 लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री दिसून आली. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधतेनं पाऊलं उचलल्याचं चित्र दिसून आलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.