शेअर बाजारात मंगळवार ठरला अमंगळ! सेन्सेक्स 1150 अंकांनी कोसळला, सोने-चांदीतही मोठी दणआपट, ग्राहकांना आनंदाच्या उकळ्या

Share Market Crash: शेअर बाजारात मंगळवार हा घातवार ठरला आहे. गेल्या काही महिन्यातील घसरणीच्या मालिकेत आजच्या दिवसाची भर पडली आहे. मंगळवारी अचानक बाजारात पडझडीला सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी पाहता पाहता क्रॅश झाले. तर सोने आणि चांदीत ही मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

शेअर बाजारात मंगळवार ठरला अमंगळ! सेन्सेक्स 1150 अंकांनी कोसळला, सोने-चांदीतही मोठी दणआपट, ग्राहकांना आनंदाच्या उकळ्या
शेअर बाजारात मोठी घसरण
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 24, 2026 | 2:24 PM

Share Market Crash: मंगळवार शेअर बाजारासाठी अमंगळ ठरला. बाजार उघडातच पडझडीला सुरुवात झाली. बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स उघडताच दणकावून कोसळला. दुपारी 12 वाजता हा निर्देशांक 1150 अंकांनी आपटला. तर निफ्टी 5० निर्देशांक 300 अकांहून अधिकने गडगडला. गुंतवणूकदारांसह ट्रेडर्सला लाखोंचा फटका बसला. अनेक हौस-नवसे आणि गवसे गुंतवणूकदार गेल्या काही दिवसांपासून बाजारात फेरफटकाही मारत नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे सोने-चांदीतील दणआपटमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काय आहे आजची मोठी अपडेट?

Sensex, Nifty-50 पत्त्यासारखे कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी-5० ने आज गुंतवणूकदारांना पुन्हा काळजीत टाकले. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सारखे भूकंप येत आहेत. या आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी, मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आज घसरणीसह उघडला. कालचा बंद 83,294 अंकांच्या तुलनेत सकाळच्या सत्रात 83,052 अंकापर्यंत घसरला. त्यानंतर झपाट्याने निर्देशांक खाली आला. बीएसई इंडेक्स 1157 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 82,137 अंकावर आपटला. निफ्टी-50 सुद्धा त्याच वाटेवर चालला. निफ्टी निर्देशांक काल 25,713 अंकाच्या तेजीवर बंद झाला होता. मंगळवारी सुरुवातीला हा निर्देशांक घसरून 25,641 अंकावर आला. त्यानंतर निर्देशांकात 326 अंकांची घसरण झाली. निफ्टी-50 घसरून 25,387 अंकावर आदळला.

सोन्याकडून आनंदवार्ता

शेअर बाजारा घसरणीसह वायदे बाजारात(Commodity Market) मोठी उलथापालथ दिसून आली. कालपर्यंत सोने आणि चांदीत तुफान आले होते. पण आज दोन्ही धातूंनी युटर्न घेतला. MCX वर 2 एप्रिल रोजी बंद होणारे सोने सोमवारी 1,61,598 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर मंगळवारी हा भाव 1,60,295 रुपयांपर्यंत घसरला. सोने हे 2303 रुपयांनी स्वस्त झाले. या घसरणीमुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आता त्याच्या उच्चांकावरून 32,801 रूपयांनी स्वस्त मिळत आहे.

चांदीच्या किंमतीत चढउतार

सोन्यासोबतच चांदीच्या भावतही (MCX Silver Price) चढउतार दिसून आला. 5 मार्च रोजी बंद होणार्‍या 1 किलो चांदी तेजीसह उघडली. पण अचानक या धातुत पडझड सुरू झाली. मागील बंद पासून वायदे बाजारात चांदी 2100 रुपयांनी घसरली. पण थोड्याच वेळात चांदीच्या किंमती पुन्हा सावरल्या. चांदी वधारली. पण चांदी तिच्या उच्चांकापेक्षा 4,20,048 रुपये प्रति किलोच्या तुलनेत आताही 1.56 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.