भारतीय सराफा व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’; रत्नं आणि आभूषणांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

Gold jewelry export | चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, एप्रिल-सप्टेंबरमध्ये, रत्नं आणि दागिन्यांची निर्यात मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 134.55 टक्क्यांनी वाढून 1,40,412.94 कोटी रुपये झाली.

भारतीय सराफा व्यापाऱ्यांना 'अच्छे दिन'; रत्नं आणि आभूषणांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 6:44 AM

मुंबई: भारतीय सराफा व्यापाऱ्यांसाठी सध्या ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. कारण गेल्या काही काळात भारतातून होणाऱ्या रत्नं आणि दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय भर पडली आहे. ही निर्यात सप्टेंबर 2021 मध्ये 29.67 टक्क्यांनी वाढून 23,259.55 कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलकडून (जीजेईपीसी) शनिवारी ही माहिती देण्यात आली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा आकडा 17,936.86 कोटी रुपये होता. त्याच वेळी, सप्टेंबर 2019 मध्ये 23,491.20 कोटी रुपयांची रत्नं आणि दागिने निर्यात झाली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, एप्रिल-सप्टेंबरमध्ये, रत्नं आणि दागिन्यांची निर्यात मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 134.55 टक्क्यांनी वाढून 1,40,412.94 कोटी रुपये झाली.

एप्रिल-सप्टेंबरमध्ये 1,40,412.94 कोटी किंवा 18.98 अब्ज रुपयांच्या निर्यातीसह, रत्ने आणि दागिने क्षेत्राने $ 41.66 अब्ज डॉलर्स या निर्यात उद्दिष्टाच्या जवळपास निम्मे (सुमारे 46 टक्के) लक्ष्य साध्य केले आहे. लॉकडाऊननंतर बाजारपेठा उघडल्याने आणि हळूहळू मागणी सामान्य झाल्यामुळे व्यापारात वाढ झाल्याचे मत जीजेईपीसी अध्यक्ष कोलिन शहा यांनी व्यक्त केले.

निर्यात आणखी वाढण्याची आशा

आता सणांचा हंगाम येत आहे. अशा परिस्थितीत जीजेईपीसीला आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत निर्यातीचे लक्ष्य गाठण्याची आशा आहे. कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात (सीपीडी) एप्रिल-सप्टेंबर, 2021 मध्ये 122.62 टक्क्यांनी वाढून 91,489.2 कोटी रुपये झाली. गेल्यावर्षी याच कालावधीत हे 41,095.89 कोटी रुपये इतकी होती.

सोन्याच्या दागिन्यांची निर्यात 262.66 टक्क्यांनी वाढून एप्रिल-सप्टेंबरमध्ये 8,100.97 कोटी रुपयांवरून 29,379.36 कोटी रुपये झाली. या कालावधीत चांदीच्या दागिन्यांची निर्यात 48.25 टक्क्यांनी वाढून 9,477.39 कोटी रुपयांवर पोहोचली, जी गेल्यावर्षी 6,392.65 कोटी रुपये इतकी होती.

सोन्याने केला 48 हजारांचा टप्पा पार

सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीचे दर पुन्हा चमकत आहेत. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, या आठवड्यात सोने 1,159 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 48,125 रुपये झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 46,966 रुपयांवर होता. तर सराफा बाजारात चांदी 1,915 रुपयांनी महाग होऊन 63,290 रुपये प्रति किलो झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 61,375 रुपये प्रति किलो होती.

या महिन्यात आतापर्यंत सराफा बाजारात सोने 1,658 रुपयांनी महाग झाले आहे. 1 ऑक्टोबर रोजी ते प्रति 10 ग्रॅम 46,467 रुपये होते, जे आता 48,125 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदीचे दर 1 ऑक्टोबर रोजी ते 59,408 रुपये प्रति किलो होते, जे आता 63,290 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये चांदी 3,882 रुपयांनी महाग झाली आहे.

संबंधित बातम्या:

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील बाजारपेठा गजबजल्या; घरं, गाड्या आणि सोन्याची जोरदार खरेदी

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....