AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचवी फेल बिझनसमन कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये देतोय कार, फ्लॅट आणि बरंच काही, एका दिलदार बॉसची अनोखी कहाणी

आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि फ्लॅट बोनसमध्ये गिफ्ट देणाऱ्या दिलदार बॉसचा प्रवास शून्यातून सुरु झाला होता. कसे मिळविले त्यांनी यश...

पाचवी फेल बिझनसमन कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये देतोय कार, फ्लॅट आणि बरंच काही, एका दिलदार बॉसची अनोखी कहाणी
Savjibhai-DholakiaImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 17, 2023 | 1:47 PM
Share

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : तुम्ही दिवाळीला बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि फ्लॅट देणाऱ्या उद्योजकाबद्दल नक्कीच ऐकले असेल. परंतू सूरत येथील या अनोख्या उद्योजकाची सुरुवात मात्र अत्यंत गरीबीतून झाली होती. केवळ 12 रुपयांत आपल्या करीयरची सुरुवात करणाऱ्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या उद्योजकाची माहीती तुम्हाला त्यांच्या बोनसमुळे झाली असेलच. आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चक्क मर्सिडीज कार वाटणाऱ्या या अनोख्या दिलदार उद्योजकाची कहानी तुम्ही वाचणार आहात.

गुजरातच्या मरेली जिल्ह्यातील डुढाला गावाचे सावजीभाई ढोलकीया अख्ख्या जगात सर्वात जास्त बोनस दिल्यामुळे चर्चेत आले आहेत. चौथीपर्यंत शिकलेले सावजीभाई 1977 मध्ये आपल्या गावातून केवळ 12.5 रुपये घेऊन सुरतला निघाले होते. हे पैसे तर बसच्या भाड्यातच संपले. त्यांनी बिकट परिस्थितीतून वाट काढीत 1.5 अब्ज डॉलरचे ( 12 हजार कोटी रुपये) साम्राज्य उभे केले आहे.

बोनसमुळे जगभरात ओळख झाली

डायमंड नगरी सुरत येथील डायमंड व्यापारी सावजीभाई यांचा व्यापार इतका वाढला आहे की त्यांना कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार, फ्लॅट, स्कुटर देत असतात. त्यांनी आपल्या  काही कर्मचाऱ्यांना तर मर्सिडीज कार देखील गिफ्ट दिली आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांनी दिलदार बॉस म्हटले जाते. दिवाळीत सर्वाधिक बोनस दिल्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहेत. यात त्यांनी अनोखी परंपरा तयार केली आहे.

घरातून 12 रुपये घेऊन निघाले

घरच्या परिस्थितीने 13 वर्षांचे असताना सावजी यांनी शाळा सोडली. 1977 मध्ये ते आपले गाव सोडून सुरतला त्यांच्या काकांकडे आले. तेथे त्यांनी डायमंड ट्रेंडींगमधील बारकावे शिकले. सुरतच्या कारखान्यात 179 रुपये महिना वेतनावर काम केले. त्याकाळी महिन्यातील 140 रुपये खाण्यापिण्यावर खर्च करुन ते 39 रुपये वाचवायचे. सावजी यांनी मित्राकडून हिरा पॉलिशिंगचे काम शिकले. दहा वर्षे त्यांनी हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम केले आणि हळूहळू त्यांचा या व्यापाऱ्यात जम बसला.

ज्या कंपनीत काम केले तिचे मालक झाले

1984 मध्ये सावजी यांनी आपले बंधू हिम्मत आणि तुलसी सोबत हरिकृष्णा एक्सपोर्टस् नावाने कंपनी काढली. ही कंपनी डायमंड आणि टेक्सटाईल क्षेत्रात काम करते. या कंपनीचे ते मालक झाले. सहा हजार कामगार त्यांच्या हाताखाली काम करतात. कंपनी गुणवत्ता आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे.

कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार गिफ्ट

हरे कृष्ण डायमंड कंपनीत 25 वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या तीन मॅनेजरना 11 कोटी किंमतीची मर्सिडीज कार गिफ्ट केली होती. त्यांनी दिवाळीत बोनस म्हणून घर, कार, मोपेड दिली आहे. आठ वर्षे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला त्यांनी एक कोटी रुपयाचा चेक दिला होता. यामुळे सावजी ढोलकीया प्रसिद्ध झाले.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.