निर्यात वाढल्याने साखर महागली

गेल्या काही महिन्यांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलसह सर्वच वस्तू महागल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशात साखरेचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन देखील साखारेच्या दरात प्रति कोलो  5 रुपयांची वाढ झाली आहे.

निर्यात वाढल्याने साखर महागली
साखर
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 6:17 PM

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलसह सर्वच वस्तू महागल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशात साखरेचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन देखील साखारेच्या दरात प्रति कोलो  5 रुपयांची वाढ झाली आहे. साखरेची निर्यात वाढवल्याने भाव वधारले असल्याचे दिसून येत आहे.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 26 जुलै 2021 ते 26 ऑक्टोबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत साखरेचे दर तब्बल पाच रुपयांनी वाढले आहेत. 26 जुलै 2021 ला साखरेचे दर 38 रुपये प्रति किलो होते.  त्यामध्ये वाढ होऊन 26 ऑक्टोबरला साखर 43 रुपयांवर पोहोचले आहेत.

भारतामध्ये दरवर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र गेल्या वर्षी जगासह देशावर कोरोनाचे संकट असल्याने निर्यातीला ब्रेक लागला होता. निर्यात घटल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला, त्यामुळे दर नियंत्रणात होते. मात्र आता हळूहळू जग कोरोनाच्या संकटातून सावरत असून, निर्यातीला वेग आला आहे. भारताने साखरेची निर्यात वाढवल्याने गेल्या तीन महिन्यामध्ये साखरेचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चालू वर्षामध्ये साखर कारखान्यांनी तब्बल 72 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. केंद्राकडून कारखान्यांना निर्यात करामध्ये सूट देण्यात आली असून, त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा सध्या साखर उद्योगाला होत  आहे. मात्र निर्यात वाढल्याने दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे दर देखील वाढले आहेत.

अनेक देशांत साखरेची टंचाई 

विविध देशांकडून इंधनाला पर्याय म्हणून ऊसापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे ऊसापासून अधकाधिक प्रमाणात इथेनॉलची निर्मिती करण्यात येत असून, परिणामी साखरेची टंचाईन निर्माण झाली आहे. भारत जगातील  साखर निर्यात करणार एक प्रमुख देश असून, अनेक देशांना भारतातून साखर पुरवली जाते. सध्या साखरेचा तुटवडा असल्याने मागणी वाढली आहे. परंतु दुसरीकडे निर्यात वाढल्याने भारतामध्ये साखर महाग झाली आहे.

संबंधित बातम्या

धनत्रयोदशीच्या  मुहुर्तावर सराफा बाजारात तेजी

दिवाळी धमाका: गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करा आणि वयाबरोबर कमाई वाढवा

दिवाळी बोनसची ‘इथे’ करा गुंतवणूक; मिळवा अधिक फायदा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.