AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टाटांची’ ही कंपनी विकली, टाटा ग्रुपला का विकावी लागली ही कंपनी?

Tata Communications: टाटा आणि ऑस्‍ट्रेलियातील कंपनीने टाटा कम्युनिकेशन्स आणि Findi यांनी या करारासंदर्भात संयुक्‍त पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व नियमांचे पालन करत दोन्ही कंपन्यांमध्ये 28 फेबुवारी 2025 रोजी करार पूर्ण झाला.

'टाटांची' ही कंपनी विकली, टाटा ग्रुपला का विकावी लागली ही कंपनी?
टाटा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 01, 2025 | 3:58 PM
Share

Tata Communications: टाटा ग्रुपच्या ताफ्यातून एक कंपनी कमी झाली आहे. टाटा कम्युनिकेशन्सचे स्‍वामित्‍व असलेली सब्सिड‍ियरी कंपनी टाटा कम्‍युनिकेशन्स पेमेंट सॉल्‍यूशंस लिमिटेड (TCPSL) मधील शंभर टक्के भागेदारी विकली आहे. आता ही कंपनी विदेशी कंपनीच्या हातात गेली आहे. ऑस्‍ट्रेलियातील फर्म या कंपनीची भारतीय शाखा पाहणार आहे. टाटांच्या या सहायक कंपनीला ऑस्ट्रेलियातील डिजिटल पेमेंट आणि फायनेंशियल सव्हिसेज कंपनी फिंदी (Findi ) च्या भारतीय शाखा ट्रांजॅक्‍शन सॉल्‍यूशन्स इंटरनॅशनल प्राइव्हेट लिमिटेडने घेतले आहे.

टाटा आणि ऑस्‍ट्रेलियातील कंपनीने टाटा कम्युनिकेशन्स आणि Findi यांनी या करारासंदर्भात संयुक्‍त पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व नियमांचे पालन करत दोन्ही कंपन्यांमध्ये 28 फेबुवारी 2025 रोजी करार पूर्ण झाला.

टाटा ग्रुपने का विकली कंपनी?

टाटाची कंपनी टाटा कम्युनिकेशन्सला आता नेटवर्क, क्लाउड, सायबर सिक्योरिटी आणि मीडिया सर्व्हिसेजसारख्या मुख्य व्यवसायावर फोकस करायचे आहे. या सेक्‍टर्समध्ये चांगली ग्रोथ असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच या क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे टाटा कम्‍युनिकेन्सने ही कंपनी विकली आहे. टाटा कम्‍युनिकेशन्सचे सीएफओ कबीर अहमद शाकीर यांनी सांगितले की, ‘आमचा व्यवसाय खूप मजबूत करण्यासाठी ही डील करण्यात आली आहे. आम्ही अशा क्षेत्रात गुंतवणूक करु इच्छितो, ज्यात भविष्यात जास्त शक्यता दिसणार आहे.

वाढ नसताना ऑस्ट्रेलियातील कंपनीने का गेली गुंतवणूक?

ऑस्ट्रेलियातील कंपनीला ही डील एखादा जॅकपॉटसारखी आहे. या अधिग्रहणानंतर फिंदीला 4600 जास्त ATM चे नेटवर्क मिळणार आहे. तसेच व्‍हाइट लॅबल एटीएम प्‍लॅटफॉर्म आणि पेमेंट स्विच यासारखी टेक्‍नोलॉजीचा एक्‍सेस मिळणार आहे. या डीलमुळे फिंदीला 1.8 लाखपेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये ATM लावण्यात येणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ दीपक वर्मा यांनी म्हटले की, ज्या लोकांपर्यंत बँकींग सुविधा नाही, त्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ही डील आम्हाला फायदेशीर ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा