Share Market : बाजारात फायद्याची संधी की मंदीने होणार नुकसान..जाणून घ्या बाजाराचा अंदाज..

Share Market : बाजारात या आठवड्यात फायद्याची संधी मिळणार की नुकसान होणार?

Share Market : बाजारात फायद्याची संधी की मंदीने होणार नुकसान..जाणून घ्या बाजाराचा अंदाज..
काय असेल बाजाराची स्थितीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 9:02 PM

नवी दिल्ली : या आठवड्यात शेअर बाजाराची (share Market) दिशा काय ठरणार आहे? तिमाही आणि जागतिक (World) परिणाम यांच्या आधारे बाजार काय कामगिरी काय असेल हे स्पष्ट होईल. तर परदेशी गुंतवणूकदारांच्या (FII) भूमिकेवरही बाजाराची दशादिशा अवलंबून असेल.

रुपयाचा चढ-उतार, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा अंदाजाआधारे बाजाराची परिस्थिती काय असेल याचा गुंतवणूकदारांना अंदाज बांधता येईल. सध्या बाजारात प्रचंड चढ-उतार होत आहे. अस्थिरता आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीनचे आकडे काय सांगतात, त्यावरही शेअर बाजाराचे भवितव्य अवलंबून असेल. याशिवाय डॉलर सूचकांक, कच्चे तेल आणि अमेरिकन बाजारातील घडामोडींचा परिणामही दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

एसीसी, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, आईटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या मोठ्या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या तिमाही निकालाचा बाजारावर परिणाम दिसून येईल.

एचडीएफशी बँकेने शनिवारी सप्टेंबरचे तिमाही निकाल घोषीत केले आहे. त्यानुसार, प्रलंबित कर्जासंबंधीच्या नियमात बदल केल्याने बँकेला 22.30 टक्क्यांचा अतिरिक्त लाभ झाला आणि 11,125.21 कोटींचा फायदा झाला.

इतर कंपन्याचे तिमाही निकाल आता लवकरच येतील, त्याआधारे बाजाराची दशा आणि दिशा समोर येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होईल की नुकसान हे स्पष्ट होईल.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FPI) ऑक्टोबर महिन्यात जवळपास 7,500 कोटी रुपये काढून घेतले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचाही परिणाम आठवडाभरात बाजारावर दिसून येईल. परदेशी गुंतवणूकदारांनी 2022 मध्ये एकूण 1.76 लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.