AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : नवीन कंपनीने आल्या आल्या गाजवले मैदान! मुकेश अंबानी यांच्या JFSL ची धमाल

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या नव्या कंपनीने शेअर बाजारात धमाका केला. एनएसईवर या शेअरने मोठी घौडदौड केली. JFSL कंपनीने आल्या आल्या मैदाना गाजवले. त्यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड मिळाली आहे. ही कंपनी वित्त क्षेत्रात मोठा उलटफेर करण्याची भीती स्पर्धक कंपन्यांना आहे.

Mukesh Ambani : नवीन कंपनीने आल्या आल्या गाजवले मैदान! मुकेश अंबानी यांच्या JFSL ची धमाल
| Updated on: Jul 21, 2023 | 10:03 AM
Share

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नव्या कंपनीने कमाल केली. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने (JFSL ) आल्या आल्या मैदान मारले. त्यामुळे दिग्गज कंपन्यांना धडकी भरली आहे. ही कंपनी भारतीय वित्तीय क्षेत्रात मोठा उलटफेर करु शकते, अशी भीती स्पर्धक कंपन्यांना सतावत आहे. रिलायन्समधून ही कंपनी स्वतंत्र झाली. जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. त्यामुळे JFSL आता गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्या कोल इंडिया आणि इंडियन ऑईलपेक्षा पुढे आहे. तर रतन टाटा (Ratan Tata) यांची टाटा स्टील पण मागे फेकली गेली आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरची किंमत 20 जुलै रोजी निश्चित झाली. ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर किंमत निश्चित झाली. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना फटक्यात लॉटरी लागली.

अशी निश्चित झाली किंमत

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली.

बीएसईवर काय किंमत

बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

अनेक मोठ्या कंपन्या पिछाडीवर

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरचे एकूण मूल्य 1,66,000 कोटी रुपये म्हणजे जवळपास 20 अब्ज डॉलर इतके आहे. या भांडवलाच्या आधारे JFSL ही भारताची 32 वी मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीने पदार्पणातच अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, टाटा स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, इंडियन ऑईल आणि बजाज ऑटोला मागे टाकले आहे.

लवकरच करता येईल ट्रेडिंग

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजचे शेअर ट्रेडिंगसाठी लवकरच उपलब्ध होतील. सर्वकाही ठीक राहिले तर सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात हे शेअर सूचीबद्ध होतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने आता जिओपासून फारकत घेतली आहे. ही कंपनी एकटीच शेअर बाजारात आगेकूच करेल. तर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस तिची वेगळी वाटचाल करेल.

बजाज फायनान्सचे भांडवल जास्त

वित्तीय क्षेत्रात बजाज फायनान्सचा दबदबा कायम आहे. ही NBFC वित्तीय सेक्टरमधली मोठी कंपनी आहे. तिचे एकूण भांडवल जवळपास 44,000 कोटी रुपये आहे. तर जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजचे एकूण भागभांडवल जवळपास 1,66,000 कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये जवळपास 1,10,000 कोटी रुपये मूल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आहेत. उर्वरीत रक्कम जेएफएसएलचे मुळ भांडवल आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.