AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोन्याचा स्वींग मूड, आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त तर भारतीय बाजारात किंमतीत वाढ, काय आहेत आजचे भाव?

Gold rate today: शनिवारी, 23 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमतीत प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांची वाढ नोंदवली गेली. या वाढीनंतर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये झाला.

Gold Silver Rate Today | सोन्याचा स्वींग मूड, आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त तर भारतीय बाजारात किंमतीत वाढ, काय आहेत आजचे भाव?
आजचे सोने चांदीचे दर Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 23, 2022 | 2:59 PM
Share

Gold Silver Rate Today | या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव घसरले. त्यानंतर सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver rate today) शुक्रवारी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रचंड घसरले आहे आणि देशांतर्गत किंमतीत ही घसरण पहायला असे संकेत असले तरी शनिवारी 23 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमतीत प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांची वाढ नोंदवली गेली. या वाढीनंतर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये झाला.तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात आज 540 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 51,160 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये झाली. देशातील प्रत्येक शहरातील सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. डॉलर (Dollar) मजबूत स्थिती असल्यामुळे सोन्या चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या काळात सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वायदे बाजारात आणि सराफा बाजारात या दोन्हींमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती सातत्याने पडत आहेत. डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने हा प्रभाव दिसून येत आहे. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागाईचा दबाव ही सोन्यावर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. पण भारतीय बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर वधरले आहेत.

राज्यातील चार शहरांतील दर

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,620 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,400 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,640 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,420 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,640 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,420 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,420 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,640 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति 10 ग्रॅम 554 रुपये होता.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय