Gold Silver Price Today : चांदी पण सूसाट ! सोने पण वधारले, आजचा भाव काय

Gold Silver Price Today : सोन्यानंतर आता चांदी पण सूसाट आहे. चांदीने जोरदार उसळी घेतली आहे. काल सोने आणि चांदीने सकाळच्या सत्रात ब्रेक घेतला होता. आज सकाळी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली.

Gold Silver Price Today : चांदी पण सूसाट ! सोने पण वधारले, आजचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:23 AM

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या भावात चढाओढ सुरु आहे. सोने उजळल्यानंतर आता चांदी पण चमकली आहे. सोन्यानंतर आता चांदी पण सूसाट आहे. चांदीने जोरदार उसळी घेतली आहे. गुरुवारी सोने आणि चांदीने सकाळच्या सत्रात ब्रेक घेतला होता. आज सकाळी सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) वाढ झाली. आज या दोन्ही मौल्यवान धातुंनी दरवाढीची वर्दी दिली.19 मार्च रोजी सोन्याने रेकॉर्ड केला होता. 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. आता सोने आणि चांदी अजून किती लंबी उडी मारणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय अस्थिरता कायम राहिलास, सोने नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे. चांदीने अजून तिचा यापूर्वीचा रेकॉर्ड तोडलेला नाही.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भाव आज वधारले. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 600 रुपयांची वृद्धी झाली. आज सकाळी हा भाव 54,950 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोन्यातही वाढ झाली आहे. आज हा भाव 59,930 रुपये आहे. तोळ्यामागे 65 रुपयांची वाढ झाली. चांदीत किलोमागे आज जोरदार वाढ झाली. चांदीत 1000 रुपयांची मोठी वाढ झाली. चांदीचा भाव 72,600 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नाहीत. हे सकाळचे भाव आहे. शहरानुसार भावात तफावत असते.

चांदीचे दम लगाके..

हे सुद्धा वाचा

चांदीने आज जोरदार उसळी घेतली. चांदी किलोमागे एक हजारांनी वधारली. चांदीचा भाव आज 72,600 हजार रुपये किलो आहे. 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती. त्यानंतर चांदीत प्रचंड घसरण झाली होती. पण सोन्यापाठोपाठ चांदीचा ही भाव वधारला.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,800 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,780 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,800 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,780 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,800 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,780 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 54,830 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,,810 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.