AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top-10 Companies : या टॉप-10 कंपन्याच शंभर नंबरी! असा मिळवून दिला फायदा

Top-10 Companies : बाजारातील भांडवलाआधारे टॉप-10 कंपन्यांची यादी जाहीर झाली आहे. को आहे टॉपवर, कसा झाला गुंतवणूकदारांना फायदा

Top-10 Companies : या टॉप-10 कंपन्याच शंभर नंबरी! असा मिळवून दिला फायदा
| Updated on: Sep 17, 2023 | 6:30 PM
Share

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात या टॉप-10 कंपन्यांनी (Share Market Top-10) जान आणली. यामधील 9 कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यापेक्षा वाढले आहेत. या नऊ कंपन्यांनी मिळून बाजारात एकूण 1.80 लाख कोटी रुपयांची वाढ केली. या आठवड्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (TCS) टॉप गेनर ठरली. गेल्या आठवड्यात बीएसई बेंचमार्क 1239.72 अंकांनी वधारला. 30 शेअरचा बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी सलग 11 व्या दिवशी उंचीवर होता. गेल्या व्यापारी हप्त्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई बेंचमार्क 319.63 अंकांनी उसळला आणि 67,838.63 अंकाच्या रेकॉर्डवर बंद झाला. या तर टॉप कंपन्यांमध्ये केवळ हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड हीच एकमेव कंपनी घसरणीवर होती. या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये घसरण दिसून आली.

या कंपन्यांची आगेकूच

टॉप-10 कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (TCS) टॉप गेनर ठरली. तर हिंदुस्थान युनिलिव्हरला खास कामगिरी करता आलेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयटीसी, भारतीय स्टेट बँक, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या भांडवलात मोठी वाढ झाली.

या कंपन्यांचे वाढले बाजारातील भांडवल

  1. TCS कंपनीचे भाडवल 57,300.75 कोटींहून 13,17,203.61 कोटी रुपये झाले
  2. HDFC Bank ने 28,974.82 कोटी रुपये जोडले, भांडवल 12,58,989.87 कोटी रुपयांवर पोहचले
  3. Bharati Airtel चे मार्केट कॅप 28,354.73 कोटींहून 5,23,723.56 कोटी रुपये झाले
  4. Infosys चे बाजारातील मूल्यांकन 17,680.53 कोटी रुपयांहून 6,27,637.87 कोटी रुपये झाले
  5. ICICI Bank चे मार्केट कॅप 15,364.55 कोटी रुपयांहून 6,94,844.51 कोटी रुपये पोहचले
  6. SBI चे मूल्यांकन 13,342.3 कोटी रुपयांवरुन वाढून 5,34,048.78 कोटी रुपये झाले
  7. Reliance Industry चे MCap 7,232.74 कोटी रुपयांहून वाढून 5,59,165.44 कोटी रुपये झाले
  8. Bajaj Finance चे मार्केट कॅप 5,095,78 रुपयांच्या मदतीने 4,54,039.37 कोटी रुपये झाले
  9. Hindustan Unilever भांडवल 10,514.42 कोटी रुपयांनी घसरुन 5,80,325.55 कोटी रुपयांवर आले.
  10. ITC चे बाजारातील भांडवल 7,232.74 कोटींनी वाढून 5,59,165.44 कोटी रुपये झाले

जोमदार कामगिरी

निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी एनर्जी, निफ्टी रिएल्टी यांनी चांगला परतावा दिला. तर निफ्टी 50 इंडेक्समधील दिग्गज बजाज ऑटो, भारती एअरटेल, एमअँडएम, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांना मोठी झेप घेता आली नाही. शुक्रवारी या कंपन्या लाल रंगात न्हाल्या. 1052 स्टॉक आघाडीवर होते. तर 945 शेअरला कामगिरी बजावता आली नाही. या उलाढालीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. त्यांना या शेअरच्या माध्यमातून इंट्राडेमध्ये कमाई करता आली. तर दीर्घकालीन गुंतवणूकीचे मूल्य वधारले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.